आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेच्या धमकीनंतर आता हा देश भडकला, दाखवली आपली ताकद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅनेजुएलाच्या लष्कराने रविवारी मिलिट्री ड्रिल करत आपल्या ताकदीचे प्रदर्शन घडविले. - Divya Marathi
व्हॅनेजुएलाच्या लष्कराने रविवारी मिलिट्री ड्रिल करत आपल्या ताकदीचे प्रदर्शन घडविले.
इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता व्हेनेजुएला या देशावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. याला प्रत्तुत्तर म्हणून व्हेनेजुएलाच्या लष्कराने रविवारी मिलिट्री ड्रिल करत आपल्या ताकदीचे प्रदर्शन केले. या दरम्यान प्रेसिडेंट निकोलस मादुरो यांनी सैनिकांचा उत्साह वाढवला. ड्रिलमध्ये व्हॅनेजुएलाचे टॅंक, मिसाईल आणि फायटर जेट आदींचा समावेश होता. बोलले जात आहे की, व्हॅनेजुएला याद्वारे अमेरिकेला स्पष्ट संदेश देऊ इच्छित आहे की, त्यांचे लष्कर हस्तक्षेप खपवून घेणार नाही. ट्रम्पनी दिली लष्करी कारवाईची धमकी.....
 
- शुक्रवारी ट्रम्प यांनी म्हटले की, व्हॅनेजुएलातील परिस्थिती हाताळण्यासाठी अमेरिकेजवळ लष्करी कारवाई करण्याचा मार्ग मोकळा आहे. 
- ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर लक्षात येते की, व्हॅनेजुएलात सुरु असलेली राजकीय उलटा-पालट आणि हिंसक घटनांवर अमेरिकेचे तेथील घडामोडीवर बारीक लक्ष आहे.
 
ट्रम्प यांची धमकी म्हणजे वेडपटपणा- 
 
- ट्रम्प यांच्या वक्तव्याबाबत व्हॅनेजुएलाचे संरक्षण मंत्री व्लादिमीर पादरिनो यांनी वेडपटपणा म्हटले आहे.
- तर, व्हॅनेजुएलाचे परराष्ट्र मंत्री जॉर्ज अरेजा यांनी शनिवारी अमेरिकन प्रेसिडेंट ट्रम्प यांचे युद्ध भडकवणा-या वक्तव्याचा निषेध करत शांततेसाठी धोका असल्याचे सांगितले.
- समाचार एजन्सी शिन्हुआने अरेजा यांच्या हवाल्याने सांगितले की, ट्रम्प यांचे वक्तव्य संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. 
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, व्हॅनेजुएलाच्या मिलिट्री ड्रिलचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...