आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा धसका, चीनचा शेजाऱ्यांशी मैत्रीचा घाट, ४० अब्ज डॉलरचा निधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शेजारी देशांचा दौरा आणि संबंध सुधारणेच्या प्रयत्नामुळे घाबरलेल्या चीननेही शेजारील देशांशी बळकट संबंध स्थापन करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी या वेळी लांबच्या नातेवाइकापेक्षा जवळचा शेजारी चांगला असतो या जुन्या म्हणीचा दाखला दिला. त्यांनी आठ देशांसोबत मैत्री करारही केला.
जिनपिंग यांनी शनिवारी सिल्क रोड इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्ससाठी ४० अब्ज डॉलरच्या विशेष निधीची घोषणा केली. त्यांनी आशियाचा समुद्र शांततेचा सागर व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्राध्यक्ष जिनपिंग दक्षिण बेट हैनानमध्ये बोआओ फोरम फॉर एशियाच्या वार्षिक परिषदेत बोलत होते. परिषदेत १५ देशांच्या नेत्यांनी हजेरी लावली. यामध्य राम बरन यादव आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांचा समावेश होता. अन्य प्रमुख मान्यवरांमध्ये मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स, टाटा ग्रुपचे मानद चेअरमन रतन टाटा तसेच जगभरातील १८०० अधिकारी, उद्योगपती उपस्थित होते.

भारताचा प्रतिनिधी नाही
भारताकडून अधिकृत शिष्टमंडळ सहभागी झाले नव्हते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगदीशसिंह खेहर ब्रिक्स देशांच्या जस्टिस फोरममध्ये सहभागी होण्यासाठी इथे आले आहेत. ही बैठक बोआेओ फोरमसोबत होत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ द इंडियन इंडस्ट्रीचे माजी अध्यक्ष शेखर दत्ता उपस्थित होते.

सिल्क रोड पीओकेपासून
ऐतिहासिक सिल्क रोड चीनला मध्य आशियातून युरोपशी जोडला जातो. चीनचे नवे प्रकल्प बांगलादेश-चीन-भारत-म्यानमार कॉरिडोर (बीसीआयएम) तसेच पाकिस्तान-चीन आर्थिक क्षेत्रात आहेत. हा मार्ग पाक अधिकृत काश्मीरमधून जातो. याअंतर्गत रस्ते, ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान आणि औद्योगिक पार्क निर्माण केले जाईल. रस्ता कझाकिस्तान, किर्गीस्तान, ताजिकिस्तानपर्यंत जोडला जाईल.
सागरावर वर्चस्वाचा प्रयत्न
चीनचे हे पाऊल चीनच्या बंदरांना व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया, भारत, श्रीलंका, ग्रीस आणि केनियाच्या बंदरांशी जोडेल. भारताने हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या वर्चस्वाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.