आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#ModiInChina:शियानहून बीजिंगला मोदी, डिनरमध्ये शाकाहारी मेनू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छायाचित्र: चिनी सरकारी टीव्हीवर भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू-काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश वगळला आहे.

शियान - चीनच्या दौर्‍यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवशी शियानला भेट दिली. मोदी सध्या शियानहून ते बीजिंगला पोहोचले आहेत. शियानमध्ये मोदींना चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी डिनर पार्टी आयोजित केली होती. मोदी शाकाहारी आहेत. यासाठी डिनरमध्ये फक्त शाकाहारी मेनू ठेवण्यात आले होते. यात व्हेजिटेबल सूप, पालेभाज्या, पॅनकेक, रेड बीन राईस, मशरूमसोबत बीन कर्ड, बीनच्या सॉसमध्ये वॉटर चेस्टनट, शतावरीचा साग, कमल ककडीसह नूडल्स, डंप्लिंग्स, फळे आणि शरबताचा समावेश होता.

दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चीन दौ-याच्या पहिल्या दिवशीच चिनी सरकारी मीडियाने आपला खरा चेहरा दाखवला. मोदी यांच्या उ‍पस्थितीत चीनच्या सरकारी टीव्‍ही चॅनल सीसीटीव्हीने भारताचा वादग्रस्त नकाशा दाखवला आहे. त्यात जम्मू- काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश या भारतीय राज्यांना वगळण्‍यात आले आहे. पंतप्रधान मोदी चीनच्या दौ-यावर पोहोचले असताना संबंधित प्रकार घडला आहे. मात्र याबाबत चीन आणि भारत सरकारकडून दुजोरा मिळालेला नाही.
चीनच्या भेटीवर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी(ता.14) पहिल्या दिवसाचा दौरा आटोपून शियानहून बीजिंगकडे रवाना झाले आहेत. रात्री आठ वाजेपर्यंत ते बीजिंगला पोहोचतील.तत्पूर्वी चीनचे राष्‍ट्रपती जिनपिंग मोदींच्या सन्मानार्थ मेजवानीचे आयोजन केले होते. मोदी शाकाहारी आहेत. यामुळे मेजवानीत फक्त शाकाहारी पदार्थ ठेवण्‍यात आले होते.
यावेळी जिनपिंग यांनी मोदींना विचारले, त्यांच्या नेतृत्वाखालील गुजरातमध्‍ये विकासरुप चमत्कार कसे शक्य झाले? मात्र चिनी राष्‍ट्रपतींच्या या प्रशंसा दुर्लक्षित कर‍ित पंतप्रधानांनी पाकिस्तानमधील गुंतवणुक, स्टेपल्ड व्हिसा आणि सीमाप्रश्‍न उपस्थित केला.
1. परराष्‍ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, मोदींनी जिनपिंग यांचा सवाल, चीन पाकिस्तानमध्‍ये 46 अब्ज डॉलरची गुंतवणूक का करित आहे? याबाबत भारताची हरकत आहे. एप्रिल महिन्यात पाकिस्‍तानच्या दौ-यावर गेलेल्या चिनी राष्‍ट्रपती जिनपिंग यांनी एका इकॉनॉमिक कॉरिडोरसाठी संबंधित पैसा खर्च केला जाणार आहे.
2. मोदींनी जिनपिंगकडे चीन अरुणाचल प्रदेशातील नागरिकांना देत असलेल्या स्टेपल्ड व्हिसा देण्‍यावर चिंता व्यक्त केली. यामुळे आपल्या देशांच्या संबंधांवर परिणाम होईल.

3.मोदींनी जिनपिंगसमोर सीमा प्रश्‍नाचा मुद्दा उ‍पस्थित करुन तो चर्चेने सोडवला जावा असा जोर दिला.
चिनी राष्‍ट्रपतींनी गुजराती चमत्काराविषयी पंतप्रधान मोदींना विचारले :
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चीनच्या दौ-याच्या पहिल्या दिवशी शाही थाटात चीनमध्‍ये स्वागत करण्‍यात आले.यावेळी मोदी आणि चिनी राष्‍ट्रपती शी जिनपिंग विविध मुद्द्यांवर चर्चा केली. परराष्‍ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले, की आर्थिक क्षेत्रातील व्यापार तूटीवर दोन्ही नेत्यांनी चर्चा झाली. भारताचा व्यापार वाटा कसा वाढेल, गुंतवणूकीसाठी वातावरण कसे तयार करता येईल यावर जोर देण्‍यात आल्याचे त्यांनी स्पष्‍ट केले. चर्चा दरम्यान जिनपिंग यांनी मोदींना विचारले, त्यांच्या नेतृत्वाखाली गुजरातमध्‍ये कसा चमत्कार झाला आणि त्याची पुनरावृत्ती राष्‍ट्रीय पातळीवर कशी करणार? दोन्ही नेत्यांनी बुधवार रात्री काबूलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानिमित्त दहशतवादावरही चर्चा केली.
चीनचा तीन दिवसांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आजपासून(गुरुवार) सुरु झाला आहे. पहिल्या दिवशी चिनी राष्‍ट्रपती शी जिनपिंग यांनी मोदी यांचे मूळ शहर शियान येथे स्वागत केले. दोन्ही नेत्यांनी शियान येथील अतिथीगृहात द्विपक्षीय चर्चा केली. परराष्‍ट्र सचिव एस. जयशंकरने सांगितले, की राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांव्यतिरिक्त सीमा प्रश्‍नावरही चर्चा झाली. दोन्ही देशांमध्‍ये विश्‍वास आणि सहकार्य वाढवावे या करिता पाऊले उचलली जाणार असल्याचे, जयशंकर यांनी स्पष्‍ट केले. राजकीय, दहशतवादी, परिवाहन, सीमा प्रश्‍न आणि व्यापार तूटीवर चर्चा झाल्याचे, त्यांनी सांगितले.
मोदींनी सकाळी आठच्या सुमासार जगप्रसिद्ध टेराकोटा वॉरियर्स संग्रहालयाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी शिंग शान मंदिराला भेट दिली आहे. मोदी मंदिरातून बाहेर आल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी आणि त्यांच्याशी हात मिळवण्यासाठी अनेक लोक बाहेर जमलेले होते. त्यांच्यामध्ये एकच जल्लोष सुरू होता.
त्याआधी अगदी पहाटेच मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंगयांचे गृहराज्य शियानला पोहोचले. याठिकाणी मोदींचे भव्य स्वागत करण्यात आले. तीन देशांच्या दौऱ्यात मोदी सर्वात आधी चीनमध्ये आहेत. याठिकाणी मोदी व्यापार आणि आर्थिक करारांबरोबरच सीमारेषा आणि सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यावरही चर्चा करतील. चीननंतर मोदी मंगोलिया आणि कोरियाच्या दौ-यावरही जाणार आहेत. जिनपिंग आणि मोदी शियानच्या सरकारी गेस्ट हाउसमध्ये आयोजित बैठकीतही सहभागी होतील. दरम्यान ओमर अब्दुल्लांनी ट्वीटद्वारे मोदी स्टेपल व्हिसाचा मुद्दा उचलणार का असा प्रश्न केला.
LIVE UPDATES
7.00 PM: मोदी यांचा मेजवानीतील मेन्यू : सूप, भाज्या, पॅनकेक, रेड बीन भात, मशरुमसह बीन कर्ड, बीन सॉसमध्‍ये वॉटर चेस्टनट, शतावरीचे साग, कमल काकडी, नूडल्स, डंप्लिंग्स, फळ आणि सरबत.
-------
6.18 PM: ट्विटर हँडल @gauravpandhi ने ट्विट करुन असा दावा केला आहे, की जेव्हा नरेंद्र मोदी चीनच्या दौ-यावर असताना, तेव्हा चिनी सरकारी टीव्ही चॅनल सीसीटीव्हीने भारताचा नकाशा दाखवला.नकाशात काश्‍मीर आणि अरुणाचल प्रदेश गायब करण्‍यात आला होता.
--------------
6.00 PM: थोड्या वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सन्मानार्थ चीनचे राष्‍ट्रपती जिनपिंग मेजवानीचे आयोजन केले आहे. मेजवानीत मोदींसाठी शाकाहारी जेवणाची व्यवस्था करण्‍यात आली आहे.
-----
4.45 PM: मोदींच्या सन्मानार्थ सांस्कृतिक कार्यक्रमांना सुरुवात.
-----------
4.30 PM: शियानमध्‍ये मोदींचे मोठ्या थाटात स्वागत.चिनी कलाकार सादर कर‍ित आहेत सांस्कृतिक कार्यक्रम.
------------
4.15 PM: पंतप्रधान मोदी यांना बौध्‍द संत झुआंग यांची मूर्ती भेट देण्‍यात आली. इसवी सन 641 मध्‍ये हे संत मोदींचे जन्मस्थळ असलेले गुजरात येथील वडनगर येथे आले होते.
--------------
4.00 PM: आशियातील सर्वात मोठा पॅगोडा पाहून मोदी आणि ज‍िनपिंग निघाले. आता साऊथ सिटी वॉल जाणार.
-------------------------
3.03 PM: परराष्‍ट्र सचिव एस. जयशंकर यांनी सांगितले, की पंतप्रधान आणि चिनी राष्‍ट्रपती दरम्यान सीमा आणि नद्यांच्या प्रवाह क्षेत्रावर चर्चा झाली. नेपाळ भूकंप आणि दहशतवादाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.
-------------------
3.03 PM: जिनपिंग मोदींना पॅगोडा दाखवत आहे.
--------------
2.50 PM : राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याबरोबर नरेंद्र मोदी गूस पॅगोडाला भेट घेण्यासाठी पोहोचले.
------------------------
2.50 PM : दोन्ही शिष्टमंडळांची औपचारिक चर्चा संपली.
-----------------------------
1.25 PM: सुभाष चंद्र बोस यांचे पुतणे म्हणाले, चीनकडे नेताजींशी संबंधित अनेक महत्त्वाची कागदपत्रे.
..................................
1.20 PM: भव्य स्वागतासाठी मोदींनी मानले आभार. म्हणाले, माझा गौरव म्हणजेच भारताचा गौरव.
..................................
1.15 PM: दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात द्विपक्षीय चर्चा सुरू.
----------------------
1.00 PM : भारत-चीन यांच्या शिष्ट मंडळात थोड्याच वेळात चर्चा सुरू होणार.
--------------------------
12:00 PM: अफगानिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घानी यांच्याशी काबूलवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी चर्चा केल्याचे मोदींनी ट्विटद्वारे सांगितले.
-----------------
11:53 AM: चीनच्या लोकांचा उत्साह पाहून आनंद झाला, मोदींचे ट्विट.
----------------
11.15 AM: सायंकाळी मोदी रवाना होण्यापूर्वी जिनपिंग त्यांच्या सन्मानार्थ भोजनाचे आयोजन करणार.
-----------------
10:57 AM: अरुणाचल प्रदेशच्या लोकांसाठी स्टेपल व्हिसा देण्याचा मुद्दा केला जाऊ शकतो उपस्थित. चीनने वारंवार अरुणाचल प्रदेश दक्षिण तिबेटचा एक भाग असल्याचा दावा केला आहे.
-----------------
10:45 AM: #ModiInChina टि्वटरच्या टॉप ट्रेडींगमध्ये.
-----------------
10:07 AM: द शिंगशान मंदिरातून बाहेर पडले PM मोदी. लोकांना केले अभिवादन स्थानिक नागरिकांत मोदींशी हात मिळवण्यासाठी स्पर्धा आणि उत्साह.
-----------------
9:07 AM: द शिंगशान मंदिरात पोहोचले मोदी.
-----------------
9:07 AM: Omar Abdullah @abdullah_omar: I hope @PMOIndia is able to resolve the "stapled visa" issue so that I can also visit the Terracotta Army & Great Wall of China. #bucketlist
-----------------
8:50 AM: मोदी द शिंगशान मंदिराकडे रवाना, बौद्ध धर्माबाबत माहिती घेणार पंतप्रधान.
-----------------
9:07 AM: टेराकोटा संग्रहालयाच्या व्हिजिटर बूकमध्ये संदेश लिहिला.
-----------------
8:46 AM: PMO India @PMOIndia: The Prime Minister viewing the exhibits at the Terracotta Warriors Museum.
-----------------
8:40 AM: टेराकोटा वॉरियर्स संग्रहालयाला भेट. सैनिकांच्या मूर्त्या हात लावून पाहिल्या मोदींनी. गाईड्सकडून घेतली अत्यंत महत्त्वाची माहिती.
-----------------
8:20 AM: चीनच्या टेराकोटा वॉरियर्स संग्रहालयात पोहोचले मोदी.
-----------------
8:00 AM: PIB India @PIB_India: Chinese traditional dancers welcoming PM at Xi’an Xiangyang International Airport, through various performances
-----------------
5:16 AM: PMO India @PMOIndia: The Prime Minister reached China a short while ago.
------------------
4:17 AM: Vikas Swarup ‏@MEAIndia: Not an ordinary city. Not an ordinary welcome. PM @narendramodi being greeted at Xi’an airport.
------------------
4:06 AM: Vikas Swarup ‏@MEAIndia: Ni Hao!. PM @narendramodi arrives in the historic city of Xi’an, on the first leg of his China.
------------------
आजचा दौरा
1.00 : राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा.
2.20: गूस पॅगोडामध्ये वृक्षारोपण करणार.
3.40: साउथ सिटी वॉलला जाणार.
4.00: राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या भोजनाचा आस्वाद घेणार.
5.00 : सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार.
8.05 : बीजिंगला रवाना होणार.

राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी चीनची राजधानी बीजिंगच्या बाहेर एखाद्या पाहुण्याचे स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी जिनपिंग जेव्हा भारतात आले होते, त्यावेळी मोदींनी त्यांचे स्वागत त्यांचे गृहराज्य गुजरातमध्ये केले होते. मोदी पंतप्रधान बनल्यानंतर प्रथमच चीनच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्याबरोबर गेेलेल्या शिष्टमंडळात गुजरातचे मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे.

मोदींचा दौरा असा
चीनचे राष्ट्रपती जिनपिंग यांचे गृहराज्य शियान चीनच्या प्राचीन शहरांपैकी एक आहे. येथे मोदी जगप्रसिद्ध टेराकोटा वॉरियर्स संग्रहालय पाहायला जातील. त्यानंतर ते 'द शिंग शान मंदिर', गूस पॅगोडा, बौद्ध मंदिर आणि साऊथ सिटी वॉललाही भेट देणार आहेत. त्याशिवाय ते राष्ट्रपती जिनपिंग यांनी आयोजित केलेल्या भोजनात सहभागी झाल्यानंतर सायंकाळी बीजिंगकडे रवाना होतील.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PM मोदींच्या दौऱ्याचे PHOTO...
VIDEO पाहा अखेरच्या स्लाइडवर