आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या भाषणाची चीनमध्ये उत्सुकता, १४ मेपासून तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी चीन दौऱ्यात त्यांचे भाषण ऐकण्यासाठी तेथील नागरिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या दौऱ्यात मोदी शांघाय येथे मॅडिसन स्क्वेअरसारखे भाषण देणार आहेत. चीनमध्ये एखाद्या भारतीय नेत्याचे होणारे हे पहिलेच जाहीर भाषण ठरणार आहे.
इंडियन असोसिएशन ऑफ शांघायने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचा बुधवार हा शेवटचा दिवस होता. चीनमध्ये भारतीयांसाठी भेटीगाठींचा हा सर्वात मोठा समारंभ असेल. यानुसार चीनमध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये सुमारे ४५,००० भारतीय राहतात. पैकी १३,००० हजार विद्यार्थी आहेत. उर्वरित लोक व्यवसाय करतात किंवा स्थानिक तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकऱ्या करतात. बीजिंग, शांघाय, शेनजेन गुआंडडोंग यांसारख्या मोठ्या शहरांत सक्रिय असलेल्या इंडियन असोसिएशनने जवळपास १५ दिवसांपूर्वी या कार्यक्रमाबाबत नोटीस जारी केली होती. या कार्यक्रमात ४,००० पेक्षा जास्त लोक सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. मोदी १४ मेपासून तीन दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधान झाल्यानंतरचा मोदींचा हा पहिला चीन दौरा असेल. या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्यादृष्टीने तसेच व्यापार वाढीबाबत प्रयत्न होणार आहेत.

जिनपिंग यांच्या मूळ गावी जाणार मोदी
निर्धारित कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी चीनमधील प्राचीन शहर शिआन येथून त्यांचा दौरा सुरू करणार आहेत. हे गाव चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचे मूळ गाव आहे. जिनपिंग मोदींचे स्वागत करणार आहेत. या वेळी चीनची संस्कृती परंपरांचे दर्शन मोदींसमोर कार्यक्रमाद्वारे केले जाईल. जिनपिंग यांनी गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये भारताचा दाैरा केला होता. मोदींच्या आग्रहावरून त्यांनी अहमदाबाद येथून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात केली होती.
बातम्या आणखी आहेत...