आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Qian Hongyan Chinas Inspirational Basketball Girl In China

PHOTOS : दोन्ही पाय नसताना बनली बास्केटबॉल चॅम्पियन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - चीनच्या युवान प्रांतात राहणारी कियान हौंगयान हिने दुर्दम्य आशावादाचे अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे. त्यापासून कुणीही बोध घेऊ शकतो. कियान हौंगयानला दोन्ही पाय नाहीत. तरीही अपंगत्वावर मात करत आज ही मुलगी बास्केटबॉल चॅम्पियन बनली आहे.

कियान हौंगयान ही २००० मध्ये एका रस्ते अपघातात गंभीर जखमी झाली. त्यात तिला तिचे दोन्ही पाय गमावावे लागले. त्या वेळी ती अवघी चार वर्षांची होती. जेव्हापासून कळायला लागले तेव्हापासून ती बास्केटबॉलपटू होण्याचे स्वप्न बघत असे. परंतु पाय गमावल्याने ते कसे साकार होणार हा? प्रश्नच होता. पाय गमावले तरीही तिने धैर्य कमी झाले नव्हते. मी हे अजूनही करू शकते, असा विश्वास कियानला वाटत होता.

उत्कृष्ट जलतरणपटू
आतातर कियान चीनमध्ये अपंग लोकांसाठी सुरू करण्यात पहिल्या प्लेइंग फेडरेशनच्या स्वीमिंग क्लब जाॅइन करणारी ती पहिली स्पर्धक बनली आहे. चीनमध्ये ती सेलिब्रेटी म्हणून ओळखली जाते. कियान २० वर्षांची असून एक वर्ल्ड क्लास जलतरणपटू आहे.

हाताने खेळण्याचा सराव
दोन्हीपाय नव्हते. परंतु ही कमजोरी समजता कियानने हातांनी बास्केट बॉलचा सराव सुरू केला. कियान हातावर जोर देऊन चालते नव्हे पळते. ती याच अवस्थेत बास्केटबॉल खेळते. या खेळात तिने कौशल्य मिळवल्यानंतर चिनी माध्यमांचे तिच्याकडे लक्ष गेले. आज ती देशभरात चर्चेचा विषय ठरली आहे.

हार मानली नाही : बास्केटबॉलखेळाडू होण्यासाठी कियान दिवस- रात्र परिश्रम घेत होती. तिला कुटुंबाकडून फारशी मदत मिळाली नाही. याउपरही ती प्रयत्न करत राहिली. ती खेळाचा सराव करत राहिली.

"बास्केटबॉल गर्ल' नावाने चीनमध्ये लोकप्रिय
कियानला चीनमध्ये बास्केटबॉल गर्ल म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. बीजिंगमध्ये असलेल्या चायना पुनर्वसन केंद्रात तिच्यावर मोफत उपचार सुरू आहेत. तिला कृत्रिम पायदेखील बसवण्यात आले आहेत. याचा तिला उपयोग होत आहे. त्यासाठी तिला अनेक संस्थांनी मदत देऊ केली आहे. कृत्रिम पाय लावल्यानंतर कियानने नव्या जोमाने बास्केटबॉलचा सराव सुरू केला आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, कियानच्या आयुष्याची सफर...