आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील लाल किल्ला दाखवला लाहोरमध्ये, चीनच्या चुकीवर भारताने नोंदवला तीव्र आक्षेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताने आक्षेप नोंदविल्यानंतर SCO च्या अधिकाऱ्यांनी चुकी मान्य केली आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
भारताने आक्षेप नोंदविल्यानंतर SCO च्या अधिकाऱ्यांनी चुकी मान्य केली आहे. (संग्रहित फोटो)
बीजिंग- शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ने आपल्या मुख्य कार्यालयात एका स्वागत समारंभाचे आयोजन केले होते. या स्वागत समारंभात आयोजकांवर लाजेने मान खाली घालण्याची वेळ आली. कारण पाकिस्तानच्या एका फोटोत तिरंग्यासह लाल किल्ला दाखविण्यात आला होता. यात लाल किल्ल्याला लाहोरमधील शालीमार गार्डन म्हणुन दाखविण्यात आले होते. ही चूक समारंभाच्या आयोजकांनी केली होती.

राजदुतांनी घेतला आक्षेप

- या समारंभात चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी, चीनमधील भारताचे राजदुत विजय गोखले, पाकिस्तानचे राजदुत मसूद खालिद यांच्यासह SCO चे अन्य सदस्य उपस्थित होते.
- भारत आणि पाकिस्तानला SCO त सामील करण्यात आल्याबद्दल या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
- समारंभात उपस्थित असणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या राजदुतांनी या फोटोबद्दल आक्षेप नोंदविला.
- SCO अधिकाऱ्यांनी नंतर याबद्दल माफी मागितली. ते म्हणाले की, हा फोटो क्रॉस चेक करण्यात त्यांना अपयश आले. भारत आणि पाकिस्तानचा सहभाग असलेला हा पहिलाच कार्यक्रम होता.
- कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या बैठकीत भारत आणि पाकिस्तानला SCO चे कायमस्वरुपी सदस्य करुन घेण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...