आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जी-२० संमेलन : रोजगार वाढवणाऱ्या सुविधांवर भारताचे लक्ष

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग/वॉशिंग्टन - चीनमध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या ‘जी २०’ देशांच्या संमेलनात भारताचे लक्ष रोजगार निर्माण करणाऱ्या जागतिक पायाभूत सुविधांवर राहणार आहे. या व्यतिरिक्त सर्वसमावेशक विकासात तेजी, विकसित देशांच्या वतीने हवामानासंदर्भातल्या १०० अब्ज डॉलरच्या वचनबद्धतेशी संबंधित प्रकरणांवर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती अर्थ सचिव शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी दिली. ऑक्टोबरमध्ये गोव्यात ब्रिक्स देशांचे संमेलन होणार असून यामध्ये अमेरिकी गुणांकन संस्थेप्रमाणेच पाच सदस्य देशांसाठी गुणांकन संस्था उभारण्याच्या प्रस्तावावर चर्चा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“जी २०’ देशांचे संमेलन चार आणि पाच सप्टेंबर दरम्यान पूर्वोत्तर चीनमधील हांगझोऊ शहरात होणार आहे. भारत-चीन वित्तीय आणि आर्थिक चर्चेमध्ये भाग घेण्यासाठी दास येथे आलेले आहेत. “जी २०’ संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार असल्याचे दास यांनी सांगितले. भारत जगाला पायाभूत सुविधांच्या आवश्यकतेचा संदेश देणार असल्याचेही ते म्हणाले. जागतिक विकास साध्य करायचा पायाभूत सुविधा हा मुख्य मार्ग असल्याने यात सुधारणा सुरू ठेवण्याची मागणी भारत जागतिक समुदायाला करणार आहे.

भारतात अनेक पायाभूत सुधारणा करण्यात आल्या आहेत. यामध्ये भारताचा इतिहास खूपच मजबूत आहे. भारताने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीचे (एफडीआय) धोरण अत्यंत उदार केले आहे. संसदेत वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) मंजूर झाले आहे. त्याचबरोबर दिवाळखोरी संदर्भातील कायदा देखील लागू झाला आहे. लोकांना सरळ सबसिडी देण्यासाठी तसेच इतर साहाय्य पोहोचवण्यासाठी आधार विधेयकाला मंजुरी देण्यात आली असल्याचे दास यांनी सांगितले.

माेदींची ओबामांसोबत आठवी भेट शक्य
‘जी २०’ शिखर संमेलनात अमेरिकी राष्ट्रपती बराक ओबामा सहभागी होणार आहेत. या संमेलनाव्यतिरिक्त ओबामा आणि मोदी यांची बैठक होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास मे २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान झाल्यापासून ओबामा आणि त्यांची ही आठवी भेट ठरेल. जानेवारी, २००९ मध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर ओबामा यांचा हा ११ वा आशिया दौरा असणार आहे. यात दोन वेळा नोव्हेंबर २०१० आणि जानेवारी २०१५ मध्ये ते भारतात आले होते.
बातम्या आणखी आहेत...