आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 हजार 700 कोटींचे हे हॉटेल, येथे राहण्‍यासाठी 'रिच किड्स'च्या लागतात रांगा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
थायलंडचे काटा रॉक्स हॉटेल सध्‍या श्रीमंत मुलांचे आवडीचे ठिकाण बनले आहे. - Divya Marathi
थायलंडचे काटा रॉक्स हॉटेल सध्‍या श्रीमंत मुलांचे आवडीचे ठिकाण बनले आहे.
इंटरनॅशनल डेस्क- थायलंडचे काटा रॉक्स हॉटेल सध्‍या श्रीमंत मुलांचे (रिच किड्स) आवडीचे ठिकाणी बनले आहे. येथे येण्‍यासाठी ती अनेक महिने वाट पाहायलाही तयार असतात. हॉटेलचे खास इंटीरिअर, सुट्स इतके अ‍प्रतिम आहेत, की एकदा आल्यावर क्वचितच कोणाला परत जावे असे वाटेल. हे हॉटेल फुकेतचे रेस्तरॉं टाऊन काटाजवळ आहे. येथे लोक खास करुन याटचा आस्वाद घेण्‍यासाठी येतात. स्कायव्हिलातून दिसते अप्रतिम दृश्‍य...
 
- हे सुट्स लक्झरियस सुपर याटने प्रेरित आहे. 
- काटा रॉक्स बनवण्‍यासाठी जवळजवळ 6 हजार 700 कोटी रुपयांचा खर्च आला. 
- यात अप्रतिम 43 सुट्स आहेत. यात वन-टू-थ्री बेडरुम स्कायव्हिला, फोर बेडरुम स्कायव्हिला पेंटहाऊस आणि वन बेडरुम ओशन लोफ्ट्सचा समावेश आहे. 
- जिमसोबत येथे स्पा ट्रीटमेंट रुम्सही आहे. जोडप्यांसाठी खासगी उपचार रुम्स वेगळे बनवले आहेत. 
- या हॉटेलमध्‍ये इटली मेड फर्निचर बसवण्‍यात आले आहे. सोबतच थायलंडचे प्रसिध्‍द बांबू कारागिरीही येथे पाहता येऊ शकते. 
- हॉटेलच्या वन बेड स्कायव्हिलाचा एका रात्रीचे भाडे 51 हजार रुपये आहे. यात ब्रेकफास्टचाही समावेश आहे. 
- या हॉटेलला बेस्ट अपार्टमेंट कॅटेगिरीमध्‍ये इंटरनॅशनल प्रॉपर्टी अॅवॉर्डही मिळाला आहे.
 
किनारपट्टीवरील खाद्यपदार्थांचा आस्वाद व सेलिब्रिटी डीजे नाईट-
 
- येथील अँडमान समुद्र पाहण्‍यासारखा आहे. 
- गर्दीपासून लांब एकटाच समुद्रकिना-यावर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येऊ शकते. हे खाद्यपदार्थ खासगी शेफ बनवतात. 
- खासगी याटमधून येणा-यांना येथे जेटी दिले जाते. याने याट सहज बांधले जाऊ शकते व त्याची कोणतीही हानी होऊ नये. 
- पार्टी करण्‍या-यांसाठी येथे सेलिब्रिटी डीजेही उपलब्ध करुन दिला जातो.
 
सुंदर छायाचित्रांनी व्यापले इन्स्टाग्राम-
 
- येथे येणा-या लोकांनी इन्स्टाग्रामवर वेगवेगळे छायाचित्रे अपलोड केली आहेत. 
- एकाने सन लाउंजवर आराम करतानाचे छायाचित्र अपलोड केले आहे, तर कोणीतरी मद्यपान करतानाचे. 
- अनेक तरुणींनी ग्लॅमरस छायाचित्रेही अपलोड केले आहे. यात हॉटेलच्या लक्झरीचे प्रतिबिंब दिसत आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा फोटोज...
बातम्या आणखी आहेत...