आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोहिंग्या मुस्लिमांचे वेदना देणारे PHOTOS, अशा पद्धतीने मरण्यास मजबूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
म्यानमारपासून बांगलादेशपर्यंत पोहचण्यासाठी रोहिंग्यांना दलदलनुमा नदी पार करावी लागते. - Divya Marathi
म्यानमारपासून बांगलादेशपर्यंत पोहचण्यासाठी रोहिंग्यांना दलदलनुमा नदी पार करावी लागते.
इंटरनॅशनल डेस्क- म्यानमारमधील रखाईन प्रांतातून मागील काही महिन्यांपासून हिंसक संघर्ष सुरु आहे. या हिंसेमुळेच आतापर्यंत लाखों रोहिंग्या आपला जीव वाचवून बांगलादेशात पोहचले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार, बांगलादेशातील रिफ्यूजी कॅंम्पमध्ये आतापर्यंत 5 लाख रोहिंग्या शरणार्थी राहत आहेत. या शरणार्थी कॅम्पमध्ये नवजात बाळापासून ते 80 वर्षाच्या वृद्धांपर्यंत लोकांचा समावेश आहे. ही परिस्थिती त्यांच्यावर तेव्हा आली जेव्हा हजारों रोहिंग्या बांगलादेश पोहचण्याच्या आधीच नदीत बुडून मृत्यूमुखी पडले आहेत. अशा पद्धतीने मजबूर आहेत रोहिंग्या....
 
- म्यानमारपासून बांगलादेशपर्यंत पोहचण्यासाठी रोहिंग्यांना दलदलनुमा नदी पार करावी लागते. या नदीत बोट पलटण्याने आतापर्यंत शेकडो मुले, वृद्ध व महिलांचा मृत्यू झाला आहे. 
- नुकतेच बांगलादेशातही रोहिंग्यांवर कसा अत्याचार सुरु आहे ते समोर आले होते. तेथील लष्करी अधिका-यांनी रोहिंग्यांच्या सुमारे 20 बोटी उद्धवस्त केल्या आहेत. अधिका-यांनी या शरणार्थींना स्मगलर असल्याचा आरोप लावला आहे.  
- बांगलादेशातील कॉक्स बाजारातील दोन शरणार्थी कॅम्पमध्ये 25 ऑगस्टपासून 34 हजार रोहिंग्या मुस्लिम राहत आहेत. मात्र, आता त्यांची संख्या 5 लाखांच्या घरात गेली आहे. 
- तेथे राहणा-या लोकांना जमिन आणि छावण्या कमी पडत आहेत. शरणार्थीत महिलांची संख्या मोठी आहे. एवढेच नव्हे तर कॅम्पमध्ये  शरणार्थींना दोन वेळचे पुरेसे जेवणही मिळत नाहीये.
- याशिवाय मेडिकल सुविधांची कमतरता असल्याने कॅम्पात आजार फैलाविण्याची भीती आहे. 
 
कोण आहेत रोहिंग्या मुस्लिम?
 
- रोहिंग्या मुस्लिम प्रमुख रूपाने म्यानमारमधील अराकान प्रांतातील राहणारे अल्पसंख्यक आहेत. हजारो वर्षापूर्वी त्यांना अराकानमधील मुगल शासकांने वसविले होते. 
- वर्ष 1785 मध्ये ब्रह्मदेश (आताचा मान्यमार) मधील बौद्ध लोकांनी देशाच्या दक्षिणी भागातील अराकानवर कब्जा केला होता. त्यांनी हजारोंच्याकी संख्येने रोहिंग्या मुस्लिमांना आपल्या भागातून हाकलून दिले.
- याचमुळे बौद्ध धर्मातील लोक आणि रोहिंग्या मुस्लिमांत हिंसक आणि हत्यासारख्या राजरोस वाद सुरु आहे. जो थांबण्याचे नाव घेत नाही.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रोहिंग्या मुस्लिमांचे वेदना दाखवणारे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...