आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीन : अपार्टमेंटच्या आडमुठेपणामुळे बनवावा लागला गोलाकार उड्डाणपूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- चीन अतिशय वेगाने विकास होऊ लागले आहे. रस्ते आणि महामार्गाचे जाळे तयार केले जात आहे. त्यासाठी सरकारला भूसंपादन करावे लागत आहे. परंतु लोकांकडून जमीन ताब्यात घेताना सरकारला घाम फुटण्याची वेळ आली आहे. त्यामुळे येथे रस्त्याच्या मधोमध घरे पाहायला मिळतात. या घरमालकांसमोर सरकारचेही काही चालले नाही. ग्वाँगडाँग प्रांतातील ग्वांग्झू शहरात एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांचे मन वळवता आले नाही म्हणून एका इमारतीच्या भोवती उड्डाणपूल तयार करावा लागला.
‘हट्टी घरे’ वाढली
भाडेकरू आणि जनतेच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी अनेक प्रकारचे कडक कायदे अस्तित्वात आहेत. त्या अंतर्गत कोणाकडूनही बळजबरीने घर ताब्यात घेता येत नाही. भूसंपादनासाठी बाजारभावाप्रमाणे जमिनीचे मूल्य द्यावे लागते, परंतु त्या रकमेवर जमीन मालकाची सहमती अनिवार्य असते. दुसरीकडे स्थानिक प्रशासनाकडून सातत्याने या नियमांची पायमल्ली केली जाते, असा आरोप केला जातो. त्याचबरोबर जमिनीचे मूल्यांकनदेखील कमी केले जाते. परंतु आता सरकारनेही अशा हट्टी घरांना हटवण्यासाठी कडक धोरण अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.