आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रशियाकडून ओसाड पडलेला सबमरीन बेस खुला, युद्धाच्या भीतीने शेजारी देश हादरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्कटिकात बनवलेला व 2008 पासून ओसाड पडलेला सबमरीन बेस - Divya Marathi
आर्कटिकात बनवलेला व 2008 पासून ओसाड पडलेला सबमरीन बेस
इंटरनॅशनल डेस्क- रशियाने आर्कटिकावर मजबूत पकड करण्यासाठी 2008 पासून ओसाड पडलेले सबमरीन बेस पुन्हा खुला केला आहे. नेवीचा हा बेस फिनलँडच्या बॉर्डरवर आहे. यूएस कोस्ट गार्डचे हेड एडम पॉल यांच्या माहितीनुसार, रशियाच्या या कृतीमुळे बाल्टिक देश एस्टोनिया, लात्विया आणिर लिथुआनिया, फिनलँड, स्वीडन याशिवाय काही नाटों देशावर युद्धाचा धोका निर्माण झाला आहे. कारण पेट्रोलियम पदार्थ आणि नॅचरल गॅस विपूल प्रमाणात असलेल्या बाल्टिक समुद्रात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी रशिया कोणत्याही थराला जाऊ शकतो याची जगाला जाणीव आहे. जगाला आपली ताकद दाखवत राहिला आहे रशिया.....
 
- रशियाने नुकतेच क्रूज मिसाईलने लैस असलेल्या आपल्या दोन युद्धनौका बाल्टिक समुद्रात पाठवल्या आहेत. 
- यामुळे ब्रिटन, अमेरिकाने सुद्धा रोमानिया आणि यूक्रेनमध्ये आपली लढाऊ जेट विमाने पाठविण्याचे नियोजन केले आहे. 
- याबाबत यूएस कोस्ट गार्डचे हेड एडम पॉल यांचे म्हणणे आहे की, रशिया फक्त आपल्या नव्या नव्या वेपन्सच जगाला दाखवत सुटला नाही तर त्याच्याभोवती असलेल्या सर्व देशांच्या सीमांना वेपन्सने लेस करून युद्धाला तयार होत आहे. 
- रशियाशी तणाव निर्माण होण्याच्या भीतीने फिनलँड, स्वीडन आणि पोलंड यासारखे देश आपल्या लष्करात अधिक सैन्याची भरती करण्याचा विचार करत आहेत.
 
आतापर्यंत 6 आर्मी बेस उघडले आहेत रशियाने- 
 
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेब्रुवारी, 2014 मध्ये रशियाने शेजारी देश यूक्रेनचा भाग असलेला क्रीमिया बेटावर ताबा मिळवला होता.
- यानंतर रशियाने हळू हळू सर्व ओसाड पडलेले सिक्रेट आर्मी बेस उघडणे पुन्हा सुरु केले आहे. 
- या बेसवर लष्कराचे रहिवास आहे व जवान आधुनिक शस्त्रे घेऊन सज्ज आहेत. यातील अनेक बेस जमिनीत (अंडरग्राउंड) आहेत, जे ऊंचावरून दिसतच नाहीत.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, रशियाचे 7 सिक्रेट बेस कुठे कुठे आहेत...
बातम्या आणखी आहेत...