आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Saina Nehwal's Quarter final Win At World Badminton Championship

सिंधूने गमावले; सायनाने कमावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जकार्ता - जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत शुक्रवारचा दिवस भारताची सायना नेहवाल अाणि सिंधूसाठी ‘कहीं खुशी, कहीं गम’ देणारा ठरला. पराभवामुळे सिंधूला महिला एकेरीतील पदक गमवावे लागले. दुसरीकडे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या सायनाने उपांत्य फेरी गाठून पदकाची कमाई केली. याशिवाय तिने पहिल्यांदा या स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये धडक मारली.
सहाव्या मानांकित वांग यिहानविरुद्ध रंगतदार लढतीत सायनाने एक तास १२ मिनिटांत राेमहर्षक विजयाची नाेंद केली. तिने २१-१५, १९-२१, २१-१९ ने सामना जिंकला. यासह तिने प्रथमच या स्पर्धेच्या महिला एकेरीची उपांत्य फेरी गाठली. सुंग जि ह्यानने भारताच्या सिंधूवर २१-१७, १९-२१, २१-१६ ने मात केली.

ज्वाला गुट्टा अाणि अश्विनी पाेनप्पाला दुहेरीत बिगरमानांकित नाअाेकाे फुकुमन अाणि कुरुमी याेनाअाेने भारताच्या जाेडीला २५-२३, २१-१४ ने अशा फरकाने
पराभूत केले.