आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चार किलोमीटरवर पसरलंय चीनचे हे डिस्नीलँड, खर्च आला 36 हजार कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघायचे डिस्नीलँड 3.9 चौरस किलोमीटरमध्‍ये (963 एकर) विकसित करण्‍यात आले आहे. - Divya Marathi
शांघायचे डिस्नीलँड 3.9 चौरस किलोमीटरमध्‍ये (963 एकर) विकसित करण्‍यात आले आहे.
बीजिंग - शांघायमध्‍ये उभारण्‍यात आलेले डिस्नीलँड गुरुवारी(ता.16) नागरिकांसाठी खुले करण्‍यात आले. हा चीनचा पहिला आंतरराष्‍ट्रीय थीम पार्क आहे. मार्चमध्‍ये याच्या तिकिटाची विक्री सुरु झाली होती अन् काही तासांमध्‍ये ती संपली. डिस्नीलँडची बरीच छायाचित्रेही इंटरनेटवर लो‍कप्रिय झाली. 196 फुट उंच महाल...
- शांघायचे डिस्नीलँड 3.9 चौरस किलोमीटरमध्‍ये (963 एकर) विकसित करण्‍यात आले आहे. यासाठी एकूण 36 हजार 492 कोटी रुपये खर्च आला आहे.
- यात हॉटेल्स, रेस्तरॉं, स्विच पूल व पार्क बांधण्‍यात आले आहेत. फिरण्‍याबरोबरच येथे राहायची व्यवस्था करण्‍यात आली आहे.
- डिस्नीलँड उभारण्‍यासाठी पाच वर्ष लागली. तिच्या कॅसलची(महाल)उंची 196 फुट आहे.
- या पार्कमध्‍ये क्लासिक डिस्नी चित्रपटे, लेझर शो, डिस्नीच्या राजकुमारींच्या घरांबरोबरच चिनी संस्कृतीची झलक पाहायला मिळते.
- अशाच प्रकारचे डिस्नीलँड हॉंगकॉंगमध्‍येही आहे. ते 126 एकरावर पसरले आहे. मात्र शांघायचे डिस्नालँड यापेक्षा आठपट मोठे आहे.
तिकिट दर आहे 3 हजार 700 रुपये
- साधारण येथे प्रवेशासाठी 3 हजार 700 रुपयांचे तिकिट खरेदी करावे लागते. पण खास प्रसंगी यासाठी पाच हजार रुपये मोजावे लागतात. 16-30 जूनच्या दरम्यान सर्वाधिक गर्दी असते.
- दोन दिवसांचे तिकिट एकाच दिवशी खरेदी केल्यावर डिस्नीलँड 5 टक्के सूट देतेे.
26 वर्षांपूर्वी सुरु झाले होते प्लॅनिंग
- डिस्नीचे सीईओ बॉब इगेर यांनी सांगितले, की 26 वर्षांपूर्वी चीनमध्‍ये थीम पार्क बनवण्‍याचे प्लॅनिंग होते. मात्र 2011 मध्‍ये पार्कच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
- चिनी अधिका-यांची इच्छा होती, की त्यावर त्यांच्या देशाच्या संस्कृतीची छाप दिसावी. वॉल्ट डिस्नी कंपनी यासाठी तयार नव्हती. पण शेवटी 2011 मध्‍ये ते डिस्नीलँड उभारण्‍यास तयार झाले.
पुढील स्लाइड्सवर पाहा, शांघाय डिस्नीलँडचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)