आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा, 120 अंशात हलणारे चिनी ड्रॅगनचे शांघाय टॉवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शांघाय चीनचे सर्वात व्यस्त शहर आहे. या शहराला आशियाचे आर्थिक व्यवहाराचे मुख्‍य केंद्रही म्हटले जाते. लवकरच शांघाय जगात आपली एक वेगळी ओळख तयार होणार आहे. येथे जगातील दुसरे आणि चीनची सर्वात उंच इमारत शांघाय टॉवर लवकरच बांधून पूर्ण होणार आहे. शांघाय टॉवर 120 अंशांपर्यंत सर्क्युलर कोरमध्‍ये फ‍िरु शकतो. DNA स्ट्रँड प्रमाणे दिसणारे हे टॉवर बुर्झ खलिफानंतर(828 मीटर) दुसरे आणि चीनमधील सर्वात उंच इमारत ठरणार आहे.

शांघा टॉवरची खास वैशिष्‍ट्ये
-632 मीटर उंच शांघाय टॉवर बांधण्‍याचा एकूण खर्च 2.4 अब्ज डॉलर.
-यात जगातील सर्वात वेगवान एलिव्हेटर बसवण्‍यात आला आहे. त्याची गती 18 मीटर प्रति सेकंद आहे.
-632 मीटर उंच या इमारतीत चढण्‍यास फक्त 35 सेकंद लागणार.
-16 ते 18 हजार लोक दररोज येण्‍याची शक्यता.
- 60 हजार टन स्टील, 2 लाख 60 हजार क्युबिक कॉंक्रिट, 2 हजारापेक्षा जास्त कामगारांनी शांघाय टॉवरची उभारणी केली आहे.
- भूकंप आणि वादळालाही तोंड देऊ शकते. 9/11 सारख्‍या हल्ल्यालाही तोंड देऊ शकते.
- या इमारतीची बांधकाम 2008 मध्‍ये सुरु झाले होते. टॉवरचे डिझाइन अमेरिकन कंपनी जेन्सेलरने तयार केले आहे.
- शांघाय टॉवरमध्‍ये कार्यालये, आरामदायी हॉटेल आणि एक संग्रहालयही असणार आहे.
- शांघाय टॉवर बांधूनपूर्ण झाल्यानंतर तैवानची 509 मीटर उंच इमारत 'तैईपे 101' ला आशियातील सर्वात उंच इमारत होण्‍याचा बहुमान मिळणार आहे.
- हा टॉवर लौजियाशुई फायनान्स अँड ट्रेड झोन मध्‍ये बांधले गेले आहे. येथे शांघाय वर्ल्ड फायनान्शियल सेंटर आणि जिन माओ टॉवर आहे. यांनाही जगातील सर्वात मोठे उंच इमारतीत गणना होते.