आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shaolin Monk Break World Record By Sprinting On Water In China

VIDEO: तब्बल 400 फुट पाण्यावर धावून या बनवला WORLD RECORD

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काय कोणी पाण्यावर धावू शकतो? केवळ असे ऐकूनही अनेकांच्या भूवया उंचावतील. मात्र या अशक्य गोष्टीला बिजिंगमधील एका व्यक्तीने सत्यात उतरवले आहे. त्याला पाण्यावर धावताना पाहून अनेकांना तर आश्चर्याचा धक्काच बसला. एवढंच काय तर हा व्यक्ती केवळ पाऊले दोन पाऊले पाण्यावर चालला नाही, तर या बहाद्दराने तब्बल 400 फुटांपर्यंत वाहत्या नदीवरील पाण्यावर धाव घेतली आणि वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे.
400 फुटांपर्यंत वाहत्या नदीत पाण्यावर धावत जाऊन वर्ल्ड रेकॉर्ड बनवणाऱ्या या औलियाचे नाव आहे शाई लिलिआंग आहे. शाई लिलिआंग हा शाओलिन मॉन्क असून तो चीनचा नागरिक आहे. या नदीच्या पाण्यावर 1 सेमी जाडीचे लाकडीपुल बनवण्यात आले. या पुलावरून लगातार 6 वेळा प्रयत्न केल्यानंतर शाई लिलिआंगने हा वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. शाईने हा रेकॉर्ड बनवताना आपलाच रेकॉर्ड मोडला आहे. शाईने यापूर्वी 2009 ला पाण्यावर धावून हा कारनामा करून दाखवला होता.

पुढील स्लाईडवर पाहा, या रोमहर्षक प्रसंगाचे PHOTOS आणि शेवटच्या स्लाईडवर अंगावर शहारा आणणारा या वर्ल्ड रेकॉर्डचा VIDEO