आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये जहाज बुडाले; ५ जणांचा मृत्यू, जहाजामध्ये अजूनही ४५० व्यक्ती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हुबेई | बचाव पथकाचे जवान नदीपात्रातून मोहिमेवर निघताना. - Divya Marathi
हुबेई | बचाव पथकाचे जवान नदीपात्रातून मोहिमेवर निघताना.
बीजिंग - चीनच्या यांगत्झे नदीत चारमजली महाकाय जहाज वादळात सापडल्याने बुडाले. सोमवारी रात्री ही घटना घडली. जहाजातून ४५८ जण प्रवास करत होते. शेकडो बेपत्ता आहेत. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. केवळ १४ नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे.

यांगत्झे नदी आशियातील सर्वाधिक लांबीची नदी मानली जाते. ही नदी हुबेई प्रांतात आहे. नानजिंग शहरातून ईस्टर्न स्टार नावाचे जहाज चाँगिंग शहराच्या दिशेने निघाले होते. नानजिंगचा किनारा सोडून एक किंवा दोन मिनिटे होताच ते खराब हवामानाचे शिकार ठरले. सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेत जहाजाचा कॅप्टन आणि मुख्य अभियंता यांचे प्राण वाचले. त्यांनीच ही माहिती दिली. जहाजाचा कॅप्टन आणि अभियंता या दोघांना नंतर पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले होते. १४ जणांना वाचवण्यात यश अाले. पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. ४३९ जण अजूनही बेपत्ता आहेत. नदीपात्रात बुडालेल्या जहाजाच्या ठिकाणी मोठ्या पातळीवर बेपत्ता असलेल्यांचा शोध घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. बचाव पथकातील कर्मचा-यांना जहाजाच्या काही कोप-यांतून विशिष्ट आवाज ऐकायला मिळाले आहेत. त्या दिशेने शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. कॅप्टन आणि
अभियंता यांच्या दाव्यानुसार जहाज वादळात अडकले होते; परंतु प्रशासनाने मात्र त्यास दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे जहाज बुडण्याचे खरे कारण स्पष्ट झालेले नाही.

अजूनही सरकारला आशा
महाकाय जहाज उलटल्यानंतरही काही भागात अनेक तास उलटूनही पाणी पोहोचलेले नाही. अशा ठिकाणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. पाणी नसलेल्या जहाजाच्या भागात प्रवासी अडकून पडलेले असावेत, असा अंदाज आहे. त्यासाठी अशा भागात ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.

बचावासाठी महामोहीम
दुर्घटनेत बुडालेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी चीनने युद्धपातळीवर मोहीम हाती घेतली आहे. ३६ जहाजे, ११७ बोटी, १ हजार ८४० जवान, १ हजार ६०० पोलिस, १ हजार नागरिकांनी बचावकार्यात सहभाग घेतला आहे; परंतु खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येऊ लागले आहेत.

८० वर्षीय महिला सुदैवी
सोमवारी रात्री जहाज बुडाल्यानंतर तत्काळ त्याची माहिती बचाव पथकाला मिळाली. त्यानंतर बचाव कर्मचा-यांनी रात्री उशिरा ६५ वर्षीय महिलेला सुखरूप बाहेर काढले. सोमवारी दुपारी ८० वर्षीय महिलेलादेखील वाचवण्यात यश मिळाले आहे. ईस्टर्न स्टार जहाजात ३ वर्षांपासून ८३ वर्षांपर्यंतचे प्रवासी होते. सर्वाधिक संख्या साठी आणि सत्तरीतील प्रवाशांची होती. त्यात तीन प्रवासी ३७, ४२ आणि ५० वर्षांचेदेखील आहेत.त्यांना हुबेई रुग्णालयात दाखल केले.