आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त दक्षिण चिनी सागरी क्षेत्रात चीन उभारणार तरंगते अणुऊर्जा प्रकल्प

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - दक्षिण चिनी सागरी क्षेत्रात तरंगतणारा अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यास आमचे प्राधान्य अाहे, असे चीनने जाहीर केले आहे. वास्तविक दक्षिण चिनी सागरी क्षेत्र हा आंतरराष्ट्रीय वादग्रस्त प्रदेश आहे. आगामी पाच वर्षांत अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रदेशात स्थिर ऊर्जा उपलब्ध व्हावी या उद्देशाने हा प्रकल्प उभारला जाणार आहे, अशी माहिती वँग यिरेन यांनी दिली. ते राष्ट्रीय संरक्षण विभागातील विज्ञान-तंत्रज्ञानचे संचालक आहेत. वँग म्हणाले, सागरी क्षेत्रातील तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीसाठी आवश्यक असलेली पाहणी अगोदरच पूर्ण झाली आहे. 
 
त्याचबरोबर संशोधनही झाले आहे. त्यातून प्रकल्पाचा दर्जा निश्चित करण्यासाठी मदत होणार आहे. देशाच्या अर्थसंकल्पात या प्रकल्पाबाबतची तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात प्रदेशात आणखी काही प्रकल्प उभारणीची तयारीदेखील चीनने सुरू केली आहे. दक्षिण चिनी सागरी क्षेत्रात अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारने भर दिला आहे. त्यासाठी भरघोस निधीची तरतूद करून प्रकल्पांना चालना दिली जाणार आहे. २०१९ पासून  काही सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास प्रशासनाला वाटतो. दरम्यान वादग्रस्त बेटांवर व्हिएतनाम, फिलिपाइन्स, मलेशिया, ब्रुनेई व तैवाननेदेखील आपला मालकी हक्क सांगितलेला आहे. गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय लवादाने बेटांवरील मालकी हक्काचा चीनचा दावा फेटाळून लावत फटकारले होते.  
 
चीनमध्ये मोठी संख्या  
चीनमध्ये अणुऊर्जा प्रकल्पांचा मोठा वापर केला जातो. सध्या चालू असलेल्या प्रकल्पांची संख्या २३ आहे. २७ प्रकल्पांचे बांधकाम सुरू आहे. जगातील एक तृतीयांश अणुऊर्जा प्रकल्प चीनमध्ये अाहेत.  
 
२०११ मध्ये काम थांबले होते  
जपानमधील फुकुशिमा प्रकल्पातील किरणोत्सर्गाच्या घटनेनंतर चीनमधील काही अणुऊर्जा प्रकल्पाचे काम थांबवण्यात आले होते. २०११ मध्ये ही कामे थांबली होती. आता पुन्हा हे प्रकल्प सुरू होणार आहेत. सरकारने हालचाली वाढवल्या आहेत.  

२० तरंगत्या प्रकल्पांची महत्त्वाकांक्षी योजना  
वादग्रस्त सागरी क्षेत्रात तरंगत्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात काही प्रकल्प आणि दुसऱ्या टप्प्यात काही प्रकल्प उभारण्याची योजना चीनने आखली आहे. नजीकच्या भविष्यात चीन २० तरंगत्या प्रकल्पांची उभारणी करणार आहे, असे वँग यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजी या वृत्तपत्रास सांगितले.  
 
काय आहे उद्देश ?  
दक्षिण चिनी सागरी प्रदेशातील विविध बेटांवर पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा व्हावा. त्या भागातील वीज व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या उद्देशाने तरंगते अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या कामाला वेग देण्यात आला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...