आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Take Final Exam Among Tree Outside A Classroom In China

झाडांच्‍या सावलीत घेण्‍यात आली मिडल स्‍कुलची परीक्षा, वाचा काय आहे कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिनजियांग (चीन) - चीनमधील हेनान प्रांतातील जिनजियांग शहरात सुरू असलेल्‍या मिडल स्कूलच्‍या परीक्षांदरम्‍यान, विद्यार्थ्‍यांना वर्गखोल्‍यांबाहेर झाडांच्‍या सावलीत निसर्गरम्‍य
वातावरणात बसवण्‍यात आले. पेपर सोडवताना विद्यार्थ्‍यांना आरामदायक वाटावे यासाठी असे करण्‍यात आल्‍याचे व्‍यवस्‍थापनाचे म्‍हणने आहे.

विद्यार्थ्‍यांना असलेला परीक्षेचा ताण कमी व्‍हावा यासाठी त्‍यांना बाहेर झाडाखाली बसवण्‍यात आले अाहे. विद्यार्थ्‍यांनी केलेला अभ्‍यास त्‍यांना आठवावा व प्रभावीपणे पेपर सोडवता यावा यासाठी हा प्रयोग करण्‍यात अाला आहे, असे असे शाळेच्‍या व्‍यवस्‍थापनाने म्‍हटले आहे. मागील वर्षीही नोव्‍हेंबरमध्‍ये चिनच्‍या शानशी प्रांतामध्‍ये कॉपीप्रकरणाला आळा घालण्‍यासाठी 3,800 विद्यार्थ्‍यांना खुल्‍या मैदानात बसवून परीक्षा घेण्‍यात आली होती.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, झाडाखाली परीक्षा देताना विद्यार्थ्‍यांचे फोटो...