आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flight Attendant बनण्यासाठी चीनमध्ये इंटरव्ह्यूदरम्यान बिकिनी राऊंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परेडमध्ये सहभागी झालेल्या तरुणी. - Divya Marathi
परेडमध्ये सहभागी झालेल्या तरुणी.
हवाई वाहतुकीदरम्यान विमानातील फ्लाइट अटेंडंटसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर पूर्वीपासूनच अनेक कडक नियम लावण्यात आले आहेत. त्यात सौंदर्यासह फिगरविषयीदेखिल अनेक बाबींचा विचार केला जातो. पण चीनने याबाबतीत आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. याठिकाणी फ्लाइट अटेंडंटची नोकरी मिळवण्यासाठी तरुण आणि तरुणींची स्विमसूटमध्ये परेड घेतली गेली.

एका मॉडेलिंग एजन्सीने या इव्हेंटचे आयोजन केले होते. यामध्ये फ्लाइट अटेंडंट बनण्याची इच्छा असलेल्या सुमारे 1000 तरुण तरुणींनी सहभाग घेतला होता. यात अनेक शालेय तरुणीदेखिल होत्या. या सर्वांनी स्विमवेअरमध्ये रॅम्प वॉक केले. यावेळी प्रेक्षक म्हणून मॉडेलिंग एजन्सी आणि काही एअरलाइन्सचे प्रतिनिधी होते.

मॉडेल्स म्हणून निवड झालेल्यांना अशा प्रकारचे राऊंड असतात. पण फ्लाइट अटेंडंटसाठी हे कसे गरजेचे हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वीच चीनमधील एका एअरलाइन्सचे एका व्यक्तीला कुरुप अशल्याचे कारण देक फ्लाइट अटेंडंटची नोकरी देण्यास नकार दिला होता.
फ्लाइट अटेंडंट होण्यासाठी तरुणींसाठीचे नियम वाचा पुढील स्लाइड्सवर...
अखेरच्या स्लाइडवर पाहा, VIDEO
बातम्या आणखी आहेत...