आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतापासून ५ हजार किमी दूर अंतरावर आहे, जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंबोडिया स्थित हिंदू मंदिर - Divya Marathi
कंबोडिया स्थित हिंदू मंदिर
इंटरनॅशनल डेस्क- दक्षिण-पूर्व आशियातील कंबोडिया देश सध्या राजकीय अस्थिरतेला तोंड देत आहे. मात्र, भारत देशाचा या देशाशी खास संबंध आहे. कारण या देशात हिंदू धर्माचे सर्वात मोठे प्राचीन मंदिर आहे. कंबोडिया पर्यटक विभागाच्या माहितीनुसार, भारतापासून जवळपास 5 हजार किलोमीटर अंतरावर कंबोडिया देशातील अंकोर येथे अंकोरवट मंदिर आहे. भगवान विष्णूंना समर्पित हे विशाल हिंदू मंदिर जगातील सर्वात मोठे पूजनस्थळ आहे. सरकार दरवर्षी करते करोडो रूपये खर्च...
 
- जगातील सर्वात मोठे हे मंदिर तेथील सिमरिप शहरातील मीकांग नदी किना-यावर वसले आहे.
- वर्ल्ड हेरिटेजच्या यादीत स्थान असलेले हे मंदिर जगभरातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.
-कंबोडिया सरकार हे मंदिर चांगल्या स्थितीत राहावे म्हणून दरवर्षी करोडो रूपये खर्च करते.
- एवढेच नव्हे तर, कंबोडियाच्या राष्ट्रीय ध्वजात चिन्हात मंदिराला दाखवले गेले आहे.
- भारतीयांसह जगभरातील  दरवर्षी लाखो पर्यंटक त्याला भेट देतात.
 
मेरू पर्वताचे प्रतिक-
 
- या मंदिराला मेरू पर्वताचा सिम्बॉल मानले जाते. या मंदिराचे निर्माण 12 व्या शतकात खमेर वंशाचे सूर्यवर्मन द्वितीय नामक हिंदू शासकाने केले होते.
- चौदावे शकत सुरु होताहोता येथे बौद्ध धर्माशी संबधित लोकांचे शासन स्थापित झाले आणि मंदिराला बौद्ध रूप देण्यात आले.
- असे सांगितले जाते की, राजा सूर्यवर्मन हिंदू देवी-देवतांशी जवळीक साधून अमर होऊ इच्छित होते.
- यासाठी या राजाने एक विशिष्ठ पूजास्थळ तयार केले होते, ज्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही देवाची पूजा केली जात होती. आज हेच मंदिर अंगकोर वट नावाने ओळखले जाते.
- हे मंदिर बांधण्यासाठी पन्नास कोटी दगडांचा वापर करण्यात आला. प्रत्येक दगडाचे वजन दीड टन आहे.
- या मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताच्या कथा आढळून येतात.
- मंदिरात सीताहरण, हनुमानाचा अशोक वाटिका प्रवेश, अंगद प्रसंग, राम-रावण युद्ध इ. कथांचे कोरीव काम आहे.
- हे मंदिर उभारण्यामागे विविध मान्यता प्रचलित आहेत. एक मान्यतेनुसार स्वतः इंद्रदेवाने स्वतःच्या मुलासाठी महालाच्या स्वरूपात हे मंदिर एका रात्रीतून बांधून घेतले होते.
 
पुढे स्लाईडद्नारे पाहा, जगातील सर्वात प्राचीन हिंदू मंदिराचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...