आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या प्रवेशाबाबत चर्चेची दारे केव्हाही खुली : चीन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - अणुपुरवठादार गटामध्ये (एनएसजी) भारताच्या सदस्यत्वावर आतापर्यंत सातत्याने विरोध दर्शवणाऱ्या चीनने मंगळवारी घूमजाव केले. प्रवेशाबाबत चर्चेसाठी दारे खुली आहेत; परंतु एनपीटी नसलेल्यांना एनएसजीवर घेतले जाऊ नये, असा नियम करणारी अमेरिका आता मात्र भारताला पाठिंबा देत आहे, अशी टीकाही चीनने केली.

एनएसजीचे सदस्यत्व बहाल केले जात असताना त्यासाठीच्या नियमांत काही बदल केले जात आहेत का, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. खरे तर अमेरिकेने भारताला दिलेल्या पाठिंबा पत्राचे आम्ही अद्यापही अवलोकन केलेले नाही. परंतु एनपीटीवर (अण्वस्त्र प्रसारबंदीचा करार) स्वाक्षरी नसलेल्या देशांना एनएसजीचे सदस्यत्व दिले जाऊ नये, असा नियम तयार करण्यात आला होता. नियम करणाऱ्यांमध्ये अमेरिकाही अग्रेसर होती. एनपीटी ही एनएसजीसाठी महत्त्वाची चिरा असेल, या तत्त्वावर हा नियम तयार करण्यात आला होता, असे चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

भारताच्या अर्जाला सर्व सदस्य राष्ट्रांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नावर चीनच्या परराष्ट्र खात्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले. सोमवारपर्यंत भारताच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या चीनने दुसऱ्याच दिवशी भूमिकेवरून घूमजाव केले. दारे खुली आहेत. चर्चेची खोलीही तिकडे आहे. आम्ही विरोधात आहोत असे कधीही म्हटलेले नाही. भारत किंवा पाकिस्तानला आम्ही लक्ष्य केलेले नाही, असे चीनने म्हटले आहे. सेऊलच्या बैठकीच्या विषयपत्रिकेवर भारताच्या प्रवेशाबाबतचा मुद्दाच नाही, या दाव्यावर मात्र चीन ठाम आहे.
बातम्या आणखी आहेत...