आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्मचारी ते कलाकार सगळेच बुटके, चीनमध्ये बुटक्यांना थीम पार्कच्या माध्यमातून नोकरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुनमिंग - चीनमध्ये अनोखा थीम पार्क सुरू आहे. यात फक्त बुटके आणि बुटकेच राहतात. किंगडम ऑफ लिटल पीपल्स नावाचे हे थीम पार्क पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. बुटक्या लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २००९ मध्ये हे पार्क सुरू करण्यात आले होते.

चीनमध्ये अंधश्रद्धेमुळे बुटक्या लोकांवर समाजात वेगळे राहण्याची वेळ येते. त्यांना सहजपणे कुठल्या कार्यक्रमात सामावून घेतले जात नाही. त्यांना कुणी नोकरीही देत नाही. इतकेच नव्हे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे टोमणे ऐकावे लागतात. त्यांना न्याय देण्याच्या उद्देशाने या बुटक्यांच्या थीम पार्कची सुरुवात करण्यात आली. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे थीम पार्क सुरू झाले तेव्हा त्यावर प्रचंड टीका झाली. सरकार बुटक्यांना, बुटक्या कर्मचाऱ्यांना समाजापासून तोडू पाहत आहे, अशी टीका झाली. तरीही पार्क सुरू झाले. या पार्कमध्ये गार्ड प्राचीन काळातील पोशाख व प्लास्टिकचे कवच घालून तैनात करण्यात आले. पार्कमध्ये फायर सर्व्हिस, पोलिस दल, संसद व लोकशाही मार्गाने निवडून आलेले प्रतीकात्मक शासकदेखील आहेत. हे सर्वजण बुटके जे नृत्य कौशल्य

दाखवू शकत नाहीत त्यांना सुरक्षा, हस्तकला, केटरिंग, स्वच्छता व इतर नोकऱ्या दिल्या जातात. शेजारी शहर कुनमिंगहून हे पार्क व्यवस्थित पाहता येते. कुनमिंग शहराच्या तुलनेत हालियामध्ये पायाभूत सुविधा कमी आहेत. येथे कलाकारांची एक परेड होते. त्या वेळी हे कलाकार राजाच्या अवतीभोवती चालतात.
वेट लिफ्टिंग शो
येथे प्रवेश देण्याआधी उंची काटेकोरपणे मोजली जाते. येथे येणारे पर्यटक बहुतांश चिनी आहेत. कलाकारांसोबत ते छायाचित्रे काढून घेतात. कलाकारांनाही ते प्रोत्साहन देतात. काही कलाकारांनी सुरू केलेला वेटलिफ्टिंग शोही आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.

घरांना कुलूप लागत नाही
शिआओ शिआओ नावाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, येथे २०० कर्मचारी होते. त्यापैकी काही जण निघून गेले. कारण त्यांना घरची, कुटुंबीयांची आठवण येत होती. एका अन्य महिलेने सांगितले की, धातू तयार करण्याच्या कारखान्यातील जोखमीची नोकरी सोडून ती येथे आली. चीनमध्ये बुटक्या लोकांना रोजगाराच्या फार कमी संधी उपलब्ध आहेत. त्यांना बाहेर प्रचंड टोमणे ऐकावे लागतात. त्या तुलनेत येथे सुरक्षित आहे. येथे घरांना कुलूप लावले जात नाहीत. कारण येथे चोरी होत नाही. वैवाहिक वाद व इतर भांडणे सोडवण्यासाठी एक समिती आहे.