आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या देशात ड्रग्स माफियावर दिसताक्षणीच झाडल्या जाताहेत गोळ्या, जागोजागी मृतदेह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो यांनी ड्रग्ज या अवैध धंद्यात असलेल्या सुमारे एक लाख लोकांना मारून टाकण्याचे आदेश दिले आहेत. - Divya Marathi
फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो यांनी ड्रग्ज या अवैध धंद्यात असलेल्या सुमारे एक लाख लोकांना मारून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
इंटरनॅशनल डेस्क- फिलीपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष म्हणून रोड्रिगो दुतरते यांनी जेव्हापासून पदभार घेतला आहे तेव्हापासून तेथील ड्रग्स डिलर्संना बुरे दिन आले आहेत. रोड्रिगो राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर फक्त चार महिन्यात देशात आतापर्यंत 3500 हून अधिक ड्रग्स व्यवसायांशी संबंधित लोकांना ठार मारले आहे. फिलीपाईन्समध्ये आजकाल जागोजागी व रस्त्यावरच ड्रग्स डिलर्सचे मृतदेह पडलेले दिसत आहेत. राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो यांनी सुमारे ड्रग्ज या अवैध धंद्यात असलेल्या सुमारे एक लाख लोकांना मारून टाकण्याचे आदेश दिले आहेत.
- रोड्रिगो यांनी निर्णय घेतला आहे की, ड्रग्स माफियांच्या विरोधात कडक कारवाई करावी.
- एवढेच नव्हे तर त्यांना दिसता क्षणीच गोळ्या मारण्याचे आदेश आहेत.
- रोड्रिगो यांनी शपथ घेतली आहे की, वर्षाच्या आता देशातील ड्रग्सचे नामोनिशान मिटवून टाकेन.
- आपल्या माहितीसाठी हे की, रोड्रिगो यांनी 30 जून, 2016 रोजी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतली आहेत.
मृतदेहावर रडताहेत लोक-
- फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता की, ड्रग ट्रॅफिकर्सना कशा वाईट पद्धतीने मारले जात आहे.
- त्यांची फॅमिलीज डेड बॉडीजजवळ रडत बसलेले दिसत आहे. अनेक मृतदेह बेवारस स्थितीत पडलेले दिसत आहेत.
- या माफियाचे एन्काउंटर करण्यापूर्वी हात-पाय बांधले जात आहेत तर काहींचे तोंड चिकटटेपने चिटकवलेले असते.
घरात घुसून पोलिस मारताहेत गोळया-
- फिलीपाईन्स या देशात एवढे ड्रग स्मगलिंग वाढले आहे की, हा देशच यामुळे बदनाम झाला आहे.
- याचमुळे राष्ट्राध्यक्ष रोड्रिगो यांनी सत्तेत येताच ड्रग्ज माफियाविरोधात लढाई सुरु केली आहे.
- त्यांनी पोलिसांनी ड्रग माफियांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश दिले आहेत.
- एवढेच नव्हे तर सामान्य नागरिकांनाही ड्रग्ज माफियांना मारण्याचे आदेश दिले आहेत.
- राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर रोड्रिगो यांनी पहिले वक्तव्य केले होते की, ‘ड्रगमुळे आपला देश मागे गेला आहे. आता हे थांबवायला हवे व मी कोणत्याही स्थितीत हे बंद करणार. यासाठी मला कोणतेही किंमत मोजावी लागली तरी ती मोजायला तयार आहे.
- सामान्य लोकांत ड्रग्जचे जाळे तोडत असल्याबाबत समाधान आहे पण माफियांना दिसताक्षणी गोळ्या घालण्याच्या आदेशाबाबत त्यांच्यावर टीकाही होत आहे.
- देशातील शेवटचा एक ड्रग माफिया आणि फायनान्सर पकडले जात नाहीत तोपर्यंत ही लढाई सुरुच राहील.
- सुमारे 70 हजार ड्रग माफिया आतापर्यंत सरकारसमोर शरण आले आहेत.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, फिलीपाईन्समधील ड्रग माफियाच्या विरोधातील सुरु असलेल्या ऑपरेशनचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...