चीन सरकारने तिबेटचे धार्मिक शहर लारुंग गरमधील हजारो घरे पाडण्याचा आदेश दिला आहे. समु्द्र सपाटीपासून 13 हजार फुट उंचावर वसलेले हे शहर बौध्द इन्स्टीट्यूटीसाठी जगभर प्रसिध्द आहे. येथे 40 हजारांपेक्षा बौध्द भिक्षू व नन राहतात. चीन ही संख्या 5 हजारांपर्यंत आणू इच्छित आहे. बौध्द इन्स्टीट्यूट व्यतिरिक्त लारुंग व्हॅली एका अनोख्या प्रथेसाठीही चर्चेत असते. येथे अंत्यसंस्कारासाठी आणलेल्या मृतदेहाचे बारीक तुकडे करुन ती गिधाडांना खाण्यासाठी टाकली जातात. ही परंपरा तिबेट व मंगोलियामध्ये प्रचलित आहे. यावेळी शवाजवळ उपस्थित असतात नातेवाईक...
- यावेळी मृत व्यक्तीचे नातेवाईकही जमतात. ते मानतात, की यामुळे त्यांना स्वर्ग प्राप्त होऊ शकतो.
- बहुतेक तिबेटीयन व मंगोलियन वज्रायन बौध्द धर्म मानतात. या धर्मात आत्मा शरीर बदलतो असे मानले जाते. याचा अर्थ त्यांना शरीर सुरक्षित ठेवण्याची गरज वाटत नाही. मृत्यूनंतर शरीर त्यांच्यासाठी एक रिकाम्या भांड्याप्रमाणे असते, जे संपवण्यासाठी खुल्या आकाशाखाली टाकून दिले जाते.
काय आहेे कथा?
- गिधाड हे तिबेटीयन लोकांसाठी देवदूत असल्याचे मानले जाते. तो शरीरातून आत्म्याला स्वर्गात घेऊन जातो. येथूून त्यांना पुढील जन्मात पाठवण्याची प्रतिक्षा केली जाते. दुसरीकडे मानवी मांस अशा प्रकार दान करणे धार्मिक दृष्ट्या चांगले मानले जाते. कारण याने लहान जीव जगू शकतात.
- मात्र तिबेटीयन लोकांच्या या प्रथेची पूर्ण माहिती जमा करणे अशक्य आहे. कारण पर्यटक आल्यावर ते अशा प्रथेला विरोध करतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कशा पध्दतीने नात्यातील व्यक्तीचे अंत्यसंस्कार करतात लारुंग व्हॅलीतील लोक....
(GRAPHIC CONTENT)
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)