आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#ModiInJapan : मोदींनी चालवली बुलेट ट्रेन, कंपनीत जाऊन घेतली टेक्नोलॉजीची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिकात्मकरित्या जपानमध्ये बुलेट ट्रेन चालवताना नरेंद्र मोदी सोबत जपानचे पीएम शिंबो आबे आणि कावासाकी कंपनीचे मालक... - Divya Marathi
प्रतिकात्मकरित्या जपानमध्ये बुलेट ट्रेन चालवताना नरेंद्र मोदी सोबत जपानचे पीएम शिंबो आबे आणि कावासाकी कंपनीचे मालक...
टोकियो- जपान दौ-यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्यासमवेत बुलेट ट्रेनने प्रवास केला. त्यानंतर मोदींनी हायस्पीड टेक्नोलॉजी पाहण्यासाठी कोबे स्थित कावासाकी येथील कंपनीच्या साईटला भेट दिली. तेथे त्यांनी बुलेट ट्रेन बनविण्याची तांत्रिक माहिती घेतली. त्याआधी मोदींनी केंटेईस्थित पीएम ऑफिसमध्ये जपान आणि भारताने अणुऊर्जा करारावर स्वाक्षरी केली. मोदींनी शिंजो आबे यांच्यात केंटेईस्थित ऑफिसात सविस्तर चर्चा झाली. वार्षिक परिषदेनंतर दोन्ही देशांत सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, कौशल्य विकास, पायाभूत, स्वच्छ ऊर्जा यासह 9 क्षेत्रात उभय देशांत सहकार्य करार झाला. जपानचे खासगी क्षेत्र भारतात संस्थेची स्थापना करून त्याद्वारे 10 वर्षांत 30 हजार नागरिकांना प्रशिक्षित करण्याचे काम करणार आहे. त्याचा फायदा भारताला होईल.
2023 पर्यंत मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होणार-

- जपानच्या सहकार्याने मुंबईहून अहमदाबादला जाणाऱ्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पावर पंतप्रधान अॅबे म्हणाले, या वर्षीच्या अखेरीस त्याचे डिझाइनिंगचे काम सुरू होईल.
- 2018 मध्ये निर्मिती तर 2023 मध्ये हा प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित होणार आहे.
- भारतासोबत नागरी अणुऊर्जा करण्यात आला आहे. त्याचा उपयोग भारताने शांततापूर्ण मार्गाने करावा. ही भारताची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान अॅबे यांनी सांगितले.
- त्याआधी मोदींनी 82 वर्षीय राजे अकिहितो यांची भेट घेतली.
अणुऊर्जा प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा-
- पंतप्रधान मोदी सध्या जपान दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्यात अनेक क्षेत्रात महत्त्वाच्या करारावर सहमती झाली आहे. त्यात आर्थिक, सुरक्षाविषयक करारांचा समावेश आहे.
- अमेरिकेनंतर ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला मदत करणारा जपान हा महत्त्वपूर्ण देश ठरला आहे. अणु ऊर्जेच्या क्षेत्रात परस्परांना सहकार्य करण्यासाठी जपानने अगोदरच तयारी दर्शवली होती.
- गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अॅबे भारतभेटीवर आले होते. त्याच वेळी याबाबतची घोषणा झाली होती. परंतु त्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही मात्र होऊ शकली नव्हती.
- उभय देशांतील अणुऊर्जा करार म्हणजे मैलाचा दगड ठरेल. स्वच्छ ऊर्जेच्या क्षेत्रातील हे महत्त्वाचे पाऊल आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर स्पष्ट केले आहे.
- करारामुळे जपान भारताला अणु ऊर्जेसंबंधीचे तंत्रज्ञान निर्यात करू शकेल. त्यातून द्विपक्षीय संबंध आणखी बळकट होण्यासही मदत होणार आहे.
एम्फीबियन प्लेनबाबत डील होणार-
- मोदी या दौ-यात एम्फीबियन प्लेन US-2i बाबत डील करणार आहेत.
- भारत जपानकडून 10 हजार कोटींची 12 एम्फीबियन प्लेन US-2i खरेदी करणार आहे.
- ही अशी विमाने आहेत जे हवेत उडण्याबरोबरच समुद्रातील पाण्यातही उडू शकतात.
- दोन्ही देशादरम्यान जे करार होणार आहेत त्यातून चीनचे वाढते महत्त्व कमी करण्याचा भारत-जपानचा प्रयत्न आहे.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमान खरेदीची ही डील 2013 पासून अडकली होती. ते पाहून जपानने 720 कोटी रूपये कमी केले आहेत.
पुढे स्लाईडद्वारे पाहा, दक्षिण चीनच्या समुद्राबाबत होणा-या चर्चेबाबत चीनला आक्षेप...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...