आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनच्या येंगला म्हटले जाते टच स्क्रीनच्या दुनियेचा किंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येंग यांनी तीन दशकांपूर्वी १९८६ मध्ये मॅन्युफॅक्चरिंगचा व्यवसाय सुरू केला हाेता. तेव्हा ते घड्याळसाठी ग्लास कव्हर तयार करत हाेते. त्यानंतर त्यांना माेटाेराेलाकडून स्मार्टफाेनसाठी ग्लास कव्हर तयार करण्याची पहिली अाॅर्डर मिळाली. १० लाख स्क्रीन तयार करण्याची ही अाॅर्डर हाेती. त्यांच्या व्यवसायाच्या एकूण विक्रीचा अर्धा भाग म्हणजे ही अाॅर्डर हाेती. ही सर्वात माेठी अाॅर्डर मिळाल्यानंतर जर पुन्हा नवीन अाॅर्डर मिळाली नसती तर सर्व मशीन भंगार झाल्या असता, असे यंग यांनी म्हटले हाेते. या अाॅर्डरमुळे ते द्विधा मनस्थितीत अडकले हाेते. परंतु त्यांनी हे अाव्हान स्वीकारण्याचे ठरवले. पहिली अाॅर्डर पूर्ण हाेताच पुन्हा नवीन अाॅर्डर त्यांना सातत्याने मिळू लागल्या. फक्त माेटाेराेलासाठीच त्यांनी १०० दक्षलक्ष ग्लास तयार केले. त्यानंतर सर्वच माेठ्या कंपन्यांच्या अाॅर्डर त्यांनाच मिळू लागल्या.

२००७ मध्ये जेव्हा अॅपलचा पहिला अायफाेन अाला, तेव्हा त्याच्या टच स्क्रीनची अाॅर्डरही त्यांनाच मिळाली. अातापर्यंत ही परंपरा कायम अाहे. अाज स्मार्टफाेनची कव्हर ग्लास बनवणारी सर्वात माेठ्या कंपनीचे ते मालक अाहे. स्मार्ट फाेनचा ग्लास बनवण्याच्या व्यवसायात त्यांची पकड इतकी मजबूत अाहे की, काेणतीही दुसरी कंपनी त्यांच्यासमाेर अाव्हान उभे करू शकली नाही.
इकोनॉमिक जर्नलला दिलेल्या एका मुलाखतीत यंग यांनी म्हटले हाेते की, मी इनाेव्हेशनवर विश्वास ठेवताे. मी तयार केलेले ग्लास कव्हर फिंगरप्रिंट-प्रूफ असायला हवे अाणि स्क्रॅच रजिस्टेन्ट असायला हवे. टचस्क्रीनवर नेहमी फिंगरप्रिंट राहून जात हाेते. यासाठी मी असे तंत्रज्ञान तयार केले की, ते टचस्क्रीनला फिंगरप्रिंट प्रूफ बनवते. स्क्रीनवर स्क्रॅच येऊ नये, यासाठी अाम्ही सफायर ग्लास तयार केला. कंपनी अापल्या व्यवसायातील पाच टक्के भाग संशाेधनावर खर्च करते.

येंग यांच्या कंपनीचे कारखाने दक्षिणी चीनमधील शेनजेन अाणि हुजीहोऊ येथे अाहे. त्यांच्या कंपनीत एक लाखापेक्षा जास्त कर्मचारी अाहेत. येंग म्हणतात, कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मानसिकतेकडे लक्ष देणे सर्वात जास्त महत्त्वाचे अाहे अाणि अाव्हानात्मक सुध्दा अाहे. कर्मचारी अाणि मॅनेजरला कामाच्या निमित्ताने दीर्घकाळ घरापासून लांब राहावे लागते. काेणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची फिजिकल अाणि इमोशनल गरजा समजून घेणे सर्वात महत्त्वाचे अाहे. येंग म्हणतात, यश हे कठाेर परिश्रमामुळे येते. मानवाने नेहमी लवचिक असायला हवे अाणि अडचणीतून धडाही घेतला पाहिजे. जर सर्व काही साेपे हाेत गेले तर तुम्ही नवीन काही शिकू शकत नाही अाणि अपेक्षाही करू शकत नाही. कारण जीवनात अनेकदा अडचणींचा सामना करावा लागताे. त्यामुळे यशासाठी कठाेर संघर्ष करावा लागताे.

येंग यांनी हॉन्गकॉन्ग येथील विद्यापीठास २६ दक्षलक्ष डाॅलरची देणगी मागील वर्षी दिली. ही देणगी मुख्यत: स्कूल अाणि व्हेटरनेरी मेडिसिनसाठी हाेती. ते म्हणतात, प्राण्यांमधून मानवाकडे अाजार येण्याचे प्रमाण सातत्याने वाढत अाहे. एविअन फ्लू अाणि स्वाइन फ्लू प्राण्यांमधून अाले अाहे. यामुळे या प्रकरणाकडे लक्ष देणे जास्त गरजेचे अाहे.

येंग किन-मन, सीईओ बिल क्रिस्टल मॅन्युफॅक्टरी
तुम्ही कधी यांचे नाव एेकले नसेल,परंतु त्यांनी तयार केलेल्या प्राॅडक्टवर तुमची बाेटे राेज फिरतात. येंग किन-मन यांनी जगातील अाघाडीच्या स्मार्टफोन कंपन्या अॅपल, सॅमसंग, सोनी अाणि हुवाईसाठी टच स्क्रीन ग्लास तयार केले अाहेत.
बातम्या आणखी आहेत...