आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनमध्ये मुस्लिमांचे असे हाल, दररोज करतात निर्बंधांचा सामना...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - चीन सरकारने मुस्लिम समुदायावर सक्ती करताना आणखी एक नवा आदेश जारी केला. सरकारने सर्वच मुस्लिमांना आपल्या घरातील पवित्र धर्मग्रंथ कुराण सरकारी कार्यालयात जमा करण्याचे आदेश दिले. त्याची सुरुवात शिनजियांग प्रांतातून झाली. स्वतःला नास्तिक म्हणवून घेणाऱ्या चीन सरकारने प्रामुख्याने शिनजियांग प्रांतातील विघुर मुस्लिमांच्या विरोधात कडक नियम लागू केले आहेत. त्यामध्ये कुराणसह इस्लाम धर्माशी संबंधित सर्वच साहित्य जमा करण्याचे आदेश आहेत. चीन सरकारने याच प्रांतात मुस्लिमांना दाढी ठेवणे, रोजा ठेवणे आणि मुस्लिम पेहराव करण्यावर निर्बंध लादले आहेत.
 

- शिनजियांग प्रांतात जवळपास 1 कोटी मुस्लिम राहतात. त्यापैकी बहुतांश लोक अल्पसंख्याक विघुर मुस्लिम आहेत. 
- विघुर मुस्लिमांना चीन आपले नागरिक मानत नाहीत. या ठिकाणी चीन सरकारने गेल्या दशकात उच्चवर्णीय मानल्या जाणाऱ्या हान समुदायाला वसवण्यास सुरुवात केली. या लोकांची घरे तोडून त्या ठिकाणी हान समुदायासाठी मोठ-मोठ्या इमारती उभारल्या जात आहेत. 
- विघुर समुदायातील एक युवा वर्ग बंडखोरी आणि दहशतवादी कृत्यांकडे वळला आहे. चीनमध्ये कुठेही हल्ला झाल्यास गावचे गाव अटक केले जातात. या प्रांतात होणाऱ्या चाकू हल्ल्यांना किंवा हत्येला सुद्धा दहशतवादी हल्ला असे गृहित धरले जाते. 
- चीनने या समुदायाला हटवण्यासाठी आणि नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांच्या धर्मावर निर्बंध आणायला सुरुवात केली आहे. 
- 2008 मध्ये चीन सरकारने विघुरांच्या दाढी, कपडे, मुस्लिम टोपीसह बुर्खा आणि हिजाबवर निर्बंध लादले. रमजानमध्ये आणि ईदला सुद्धा या समुदायाला सार्वजनिकरीत्या नमाज पठण करता येत नाही. कुठल्या सार्वजनिक ठिकाणी मुस्लिम दाढी किंवा वेश दिल्यास लगेच अटक केली जाते. 
 

चीन सरकारचे काय म्हणणे आहे?
- सरकारच्या माहितीनुसार, शिनजियांग प्रांतातील विघुर मुस्लिम कम्युनिस्ट सरकार विरोधात बंडखोरी करत आहेत. तुर्की भाषा बोलणारा हा समुदाय वेगळ्या देशाची मागणी करत आहे. 
- 1949 मध्ये पूर्व तुकस्तान मानल्या जाणाऱ्या भागावर चीनने ताबा मिळवला. त्यामध्ये लाखो मुस्लिम सुद्धा चीनमध्ये समाविष्ट झाले. तेव्हापासूनच हा चीनचा भाग म्हणून ओळखल्या जातो. 
- 1990 मध्ये रशियाचे तुकडे झाल्यानंतर येथील स्थानिकांनी स्वातंत्र्यासाठी मोठा संघर्ष केला. आशिया खंडातील मुस्लिम देशांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला. मात्र, चीन सरकारने सर्वच प्रकारचे प्रयत्न हाणून पाडले. 
- हान समुदायाला शिनजियांग प्रांतात वसवण्याचे काम खास विघुरांचे आंदोलन दडपण्यासाठी सुरू असल्याचे चीन सरकारचे म्हणणे आहे. 
- 2008 मध्ये शिनजियांग प्रांतात राजधानी उरुमची येथे हिंसाचार झाला होता. त्यामध्ये 200 जणांचा मृत्यू झाला. स्थानिक चिनी माध्यमांच्या वृत्तानुसार, त्यामध्ये मोठ्या संख्येने हान समुदायातील लोकांचा समावेश होता. 
- यानंतर 2009 मध्ये त्याच ठिकाणी हिंसाचार झाला. त्यामध्ये 156 विघुरांच्या कत्तलीची नोंद आहे.
बातम्या आणखी आहेत...