आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिनी तरुणांंवर 2030 मध्ये परदेशात वधू संशोधनाची वेळ, गरीब उमेदवार वाढतील !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- वर्ष २०३० पर्यंत चीनमध्ये ३० दशलक्ष पुरुष देशामध्ये विवाह करणार नाहीत. ते चीनबाहेर वधू संशोधन करतील वा अविवाहित राहणे पसंत करतील असा अहवाल एका संशोधनात समोर आलाय. वर्ष २०२० पर्यंत ३५ ते ५९ वयोगटातील अविवाहित पुरुषांची संख्या १५ दशलक्ष असेल. ही संख्या वर्ष २०३० पर्यंत ३० दशलक्षांपर्यंत जाणार असल्याचा अंदाज संशोधक वांग गांगझोऊ यांनी वर्तवला. चायनीज अॅकॅडमी ऑफ सोशल सायन्सद्वारे ही पाहणी करण्यात आली.  

गरीब आणि कमी शिक्षण असणारे चिनी पुरुष अविवाहित राहतील. या पुरुषांना केवळ प्राथमिक शिक्षणाची संधी मिळाली. एकुणात यांचे प्रमाण केवळ १५% आहे. यूआन शीन या नानकाई विद्यापीठाच्या तज्ज्ञाने कुटुंब नियोजन धोरणाच्या परिणामांचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी वर्ष २०५० पर्यंत चीनमध्ये ३० दशलक्ष पुरुष बाहेरील देशांमध्ये वधू संशोधन करतील असे म्हटले आहे.  

स्त्री भ्रूण हत्येत वाढ
चीनमध्ये एक अपत्य धोरण राबवण्यात आले आहे. त्यामुळे स्त्री भ्रूणहत्याही मोठ्या प्रमाणात झाली. मुलगा हवा या अट्टहासापायी आता लिंग विषमतेची दरी रुंदावत चालल्याचे चित्र आहे. वर्ष २०१५ मधील आकडेवारीनुसार चीनमध्ये प्रत्येक १०० महिलांमागे ११३ पुरुष असल्याचे आकडेवारी सांगते. वर्ष २००९ नंतर लिंग गुणोत्तरात मोठी दरी निर्माण झाल्याचे चित्र आहे. संयुक्त राष्ट्राने १०० महिलांमागे १०३ ते १०७ पुरुष असे प्रमाण योग्य आहे.  देशात सामाजिक समस्या आहेत.
 
१९८० मध्ये अल्ट्रासाउंड  तंत्राचा प्रसार 
चीनमध्ये १९८० मध्ये अल्ट्रासाउंड तंत्राचा विकास झाला. रेनमिन विद्यापीठातील समाजशास्त्रज्ञ झाई झेनवू यांनी सांगितले की या तंत्राचा गैरवापर करण्यात आला. मुलाला प्राधान्य देण्यात आले. लिंगनिदान तंत्र स्वस्तात उपलब्ध असल्यामुळे लिंग गुणोत्तर विषम होत गेले. वर्ष २०१६ मधील आकडेवारीनुसार चीनमधील पुरुषांची संख्या ७०८ दशलक्ष आहे.  तर महिलांची संख्या ६७५ दशलक्ष आहे. देशाबाहेर वधू संशोधन आताी पुरुषांसाठी अनिवार्य ठरेल.
बातम्या आणखी आहेत...