वॉशिंग्टन- अमेरिकेचे फॉरेन मिनिस्टर रेक्स ट्रिलरसन यांनी चीनच्या टॉप डिप्लोमॅटसोबत फोनवर चर्चा केली. त्यांनी दोन्ही देशाच्या दरम्यान रचनात्मक हित सांभाळण्यावर एकमत झाले. तसेच उत्तर कोरियाकडून असलेला धोका अमेरिका-चीन हे मिळून निपटून काढतील यावर सहमती झाली.
- यूसच्या परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी एक स्टेटमेंट जारी केले आहे. यात ट्रिलरसन आणि चीनचे स्टेट काउंसिलर यांग जिची यांच्यात झालेल्या चर्चेची माहिती देण्यात आली.
- दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी दहशतवादविरोधात लढणे, कायदा व सुरक्षा व्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीसोबतच आर्थिक आणि व्यापारात एकमेंकाना सहकार्य करण्यावर भर दिला.
- पुढे म्हटले आहे की, "ट्रिलरसन आणि चीनचे स्टेट काउंसिलर यांग जिची यांच्यात एक रचनात्मक द्विपक्षीय संबंधांवर चर्चा व सहमती झाली.
- दोन्ही पक्षांनी उपखंडात तयार झालेला उत्तर कोरियाला एकत्र येऊन निपटून काढण्यावर सहमती झाली.
- दोन्ही नेत्यांनी फोनवर चर्चा शुक्रवारी ट्रिलरसन आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्या बैठकीनंतर झाली.
- याच महिन्यात आपल्या पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांची प्रथमच समोरासमोर चर्चा झाली.
- या बैठकीत वांग यांनी चीन आणि अमेरिका यांच्यातील काही मुद्यांवर मतभेद असतानाही जागतिक स्थैर्यासाठी एकत्र राहण्यावर भर दिला.