आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US- दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाच्या सीमेवर फोडले बॉम्ब, किम जोंगला इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिका आणि दक्षिण कोरियाने गुरूवारी संयुक्त लाईव्ह ड्रिल दरम्यान उत्तर कोरियाच्या सीमेवर बॉम्ब फोडून हुकुमशहा किम जोंग उनला इशारा दिला आहे. - Divya Marathi
अमेरिका आणि दक्षिण कोरियाने गुरूवारी संयुक्त लाईव्ह ड्रिल दरम्यान उत्तर कोरियाच्या सीमेवर बॉम्ब फोडून हुकुमशहा किम जोंग उनला इशारा दिला आहे.
इंटरनॅशनल डेस्क- उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव कमी होताना दिसत नाही. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने गुरूवारी संयुक्त लाईव्ह ड्रिल दरम्यान आपली ताकद दाखविली. अमेरिकेने ड्रिलमध्ये आपले दोन ‘बी-1बी’ बॉम्बर प्लेन आणि चार ‘एफ-35बी’ फायटर जेटच्या मदतीने उत्तर कोरियाच्या सीमेवर बॉम्ब फोडले. आपल्याला माहित असेलच की, उत्तर कोरियाने या आठवड्यात जपानच्या वरून बॅलिस्टिक मिसाईल डागले होते ज्यानंतर दोन्ही देशांदरम्यान युद्धाची स्थिती वाढली. हवाईत टेस्ट केले होते मिसाईल डिफेन्स सिस्टिम....
 
- दक्षिण कोरियाच्या डिफेन्स मिनिस्ट्रीने जारी केलेल्या निवेदनानुसार, अमेरिकेच्या दोन्ही बॉम्बर प्लेन्सने गुआम स्थित एंडरसन एयर-बेसवरून उड्डाण केले होते. तर आणखी चार फायटर जेट्सने जपान स्थित इवाकुनी एयर-बेसवरून उड्डाण केले होते. 
- या दरम्यान दक्षिण कोरियाने सुद्धा आपली चार एफ-15 फायटर प्लेन्सद्वारे या लाईव्ह ड्रिलमध्ये अमेरिकेसोबत सहभाग घेतला.
- या ड्रिलद्वारे उत्तर कोरियाच्या ‘कोर फॅसिलिटिज’ ला निशाना साधण्यासाठी तयारी करत आहे. 
- उत्तर कोरियाची सरकारी न्यूज एजेन्सी केसीएनएने या ड्रिलला बेकार असल्याचे सांगत म्हटले की, यामुळे आम्हाला काहीही फरक पडत नाही. तसेच आमचे न्यूक्लियर प्रोग्रॅम आधीसारखेच यापुढेही सुरु राहतील.  
- या ड्रिलच्या एक दिवस आधी अमेरिकन नेवीने आपल्या वॉरशिप ‘यूएसएस जॉन पॉल जोन्स’ द्वारे हवाईतील समुद्रात आपल्या मिसाईल डिफेन्स सिस्टिमची टेस्ट केली होती.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...