आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

केवळ चीनमध्ये चालणाऱ्या वुईचॅटने 150 देशांत व्यवसाय करणाऱ्या फेसबुकला मागे टाकले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हाँगकाँग- चीनमधील सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी टेनसेंट आता जगातील सर्वात मोठी पाचवी कंपनी ठरली आहे. आजवर फेसबुक या स्थानी होते. मंगळवारी टेनसेंटचे मार्केट कॅप ५२२ अब्ज डॉलर, म्हणजे ३३.९३ लाख कोटी झाले. तर, फेसबुकचे मार्केट कॅप ३३.७३ लाख कोटी रुपये आहे. वुईचॅट नावाने टेनसेंट साेशल नेटवर्किंग अॅप चालवते. वुईचॅटची सुरुवात मेसेजिंग अॅप म्हणून झाली होती. आता यावर पेमेंट, टॅक्सी बुकिंग तसेच गुंतवणुकीपर्यंतच्या सुविधा आहेत. 


चीनमध्ये फेसबुक व ट्विटरवर बंदी असून वुईचॅट सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. टेनसेंटने २०११ मध्ये वुईचॅट लाँच केले. फेसबुक २००४पासून आहे. आता टेनसेंट ५०० अब्ज डॉलरहून अधिक (३२.५ लाख कोटी रुपये) मूल्य असलेली आशियातील पहिली तंत्रज्ञान कंपनी आहे. 


यापूर्वी २००७ मध्ये चीनची पेट्रोचायना ही कंपनी लिस्ट झाली तेव्हा कंपनीचे बाजारमूल्य ६५ लाख कोटींपर्यंत पोहोचले होते. आजवर जगात कोणत्याच कंपनीचे मार्केट कॅप इतके झालेले नाही. पेट्रोचायनाचे मूल्य सध्या केवळ १४ लाख कोटी आहे हा भाग निराळा. टेनसेंटचे मूल्य वाढताच कंपनीचे संस्थापक मा हुआतेंग जगातील नववे सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. फोर्ब्जनुसार, त्यांची संपत्ती ३.१४ लाख कोटी आहे. २०१८ मध्ये मलेशियात वुईचॅट लाँच करण्याच्या घोषणेनंतर कंपनीचे शेअर प्रचंड वधारले. जुलैपासून आतापर्यंत शेअर्स किमान ६०% व २०१७मध्ये आतापर्यंत १४०% वधारले. 

 

पुढील स्लाइडवर पाहा ग्राफिक्स...

बातम्या आणखी आहेत...