आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्त्रायलमध्ये भीषण आगः 70 हजार लोकं बेघर, मुस्लिम देशांत सुरुय जल्लोष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्त्रायल मीडियाने अलअफसी नावाच्या एका यूजरच्या ट्वीटचा हवाला देत हा खुलासा केला आहे. - Divya Marathi
इस्त्रायल मीडियाने अलअफसी नावाच्या एका यूजरच्या ट्वीटचा हवाला देत हा खुलासा केला आहे.
इंटरनॅशनल डेस्क- इस्त्रायलमधील हैफा शहरातील जंगलात भीषण आग लागली असून यामुळे 70 हजार लोक बेघर झाले आहेत. दुसरीकडे, आखाती देशातील अनेक मुस्लिम देशांनी या घटनेबाबत जल्लोष सुरु केला आहे. असा दावाच इस्त्रायल मीडियाने केला आहे. एका वेबसाईटने अलअफसी नावाच्या एका यूजरच्या ट्वीटचा हवाला देत हा खुलासा केला आहे. काय म्हटलेय ट्वीटमध्ये...
 
- अलअसफी नावाच्या यूजरचे हे ट्वीट गुरुवारी वायरल झाले.  
- हे ट्वीट अरबी भाषेत लिहले आहे, ज्यात अलअसफीने आनंद व्यक्त करताना लिहले की, ...‘तेल-अवीव जळत आहे’.
- अलअसफीने अशी दोन ट्वीट केली. यासोबत त्याने इस्त्रायलमधील हैफा शहरात लागलेल्या आगीचे अनेक फोटो जोडले आहेत.
- हे ट्वीट आता अरब वर्ल्डमध्ये वायरल झाले आहे ज्यावर हजारो लोक कमेंट करत आहेत. 
- अबूधाबीतील एका पोलिस अधिका-याने ट्वीट केले की, ‘इस्त्रायलने जशी मशिदीवर बंदी घातली, त्यानंतर आगीने घेरला आहे.’
- याशिवाय इजिप्त, जॉर्डन आणि अनेक आखाती देशांतील यूजर्सनी या घटनेबाबत आनंद व्यक्त करणारी टि्वट केली आहेत.
- या प्रकरणात कुवेतच्या सर्वात मोठ्या मशिदीचा इमाम ही मागे नाही. इमामने लिहले, ‘मुबारक हो, इस्त्राईल जळत आहे.’
 
शेकडो इमारतीला आगीची झळ,  येरूसलेम शहरालाही धोका-
 
- इस्त्रायलमधील तिस-या सर्वात मोठ्या हैफा शहरातील जंगलाला मंगळवारी लाग लागली.
- वेगाच्या वा-यामुळे आग वाढत गेली आणि दुस-याच दिवशी शेकडो इमारतीला त्याची झळ पोहचली.
- या आगीमुळे सुमारे 70 हजार लोक बेघर झाले आहेत. हजारों लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. 
- जंगलात लागलेल्या आगीमुळे येरूसलम आणि पश्चिमी भागातील धोका निर्माण झाला आहे.  
- इस्त्रायलचे पब्लिक सिक्युरिटी मिनिस्टर गिलाद अर्दान यांचे म्हणणे आहे की, ही आग जाणून बुझून लावण्याची शक्यता आहे.
- इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी लोकांना आव्हान केले आहे की, घाबरून जाण्याची काहीही गरज नाही. सरकार पीडितांच्या मदतीला तत्काळ तयार आहे. 
- तसेच त्यांनी पॅलेस्टिनीकडे अप्रत्यक्ष बोट दाखवत इशारा दिला आहे की, जर ही आग मुद्दाम लावली गेली असेल तर याला दहशतवादी हल्ला मानला जाईल. तसेच आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल.
 
पुढे स्लाईडद्वारे पाहा, या घटनेशी संबंधित फोटोज...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...