आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इस्त्रायलमधील या सुंदर शहराची अशी झाली राखरांगोळी, पाहा PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्त्रायलमधील हैफा शहरात मागील मंगळवारी भीषण आग लागली होती. जी आता 5 दिवसानंतर विझवली गेली आहे. - Divya Marathi
इस्त्रायलमधील हैफा शहरात मागील मंगळवारी भीषण आग लागली होती. जी आता 5 दिवसानंतर विझवली गेली आहे.
इंटरनॅशनल डेस्क- इस्त्रायलमधील हैफा शहराजवळच्या जंगलाला लागलेली भीषण आग अखेर आटोक्यात आली आहे. ही आग मागील मंगळवारी लागली होती जी विझवायला पाच दिवस लागले. या भीषण आगीमुळे हैफा शहरातील सुमारे 70 हजार लोक बेघर झाले होते. लोक आता आपली जळालेली घरे पाहायला परत आली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, शहरातील 20000 घरांची राखरांगोळी झाली आहे. इस्त्रायल आर्मीचे होतेय कौतूक...
- इस्त्रायलच्या इतिहासातील हा आतापर्यंतची सर्वात मोठी दुर्घटना होती.
- हैफा, इस्त्रायलमधील सर्वात तिसरे मोठे शहर आहे. ज्याची लोकसंख्या 2 लाख 80 हजाराच्या आसपास आहे.
- शहराच्या उत्तरी भागात लागलेल्या आगीमुळे दुस-या दिवशी आगीने संपूर्ण शहरालाच वेढा घातला होता.
- मात्र, इस्त्रायल आर्मीने रातोरात संपूर्ण शहरवासियांना सुरक्षित स्थळी हलवले होते.
- या आगीत 20 हजार घरांची राखरांगोळी झाली आहे मात्र, एकही मृत्यू झालेला नाही.
- मात्र, जखमींची संख्या 122 आहे. हे लोक किमती वस्तू व साहित्य बाजूला घेत असताना त्यांना इजा झाली आहे.
- आर्मीने तत्काळ कार्यवाही केल्याने इस्त्रायलमध्ये आर्मी जवानांचे कौतूक होत आहे.
- देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पीडितांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. लोकांना लवकरच नवी घरे बांधून दिली जातील असेही त्यांनी सांगितले.
रशियाने पाठवली दोन ‘सी प्लेन’-
- रशियाच्या डिझास्टर मंत्रालयाने दोन सीप्लेन आणि एक ऑपरेशन ग्रुपला जंगलात लागलेली आग विझविण्यासाठी इस्त्रायलाला पाठवले होते.
- सी-प्लेनच्या पायलटांनी इस्त्रायलमध्ये दाखल होताच आग विझविण्याचे काम सुरु केले होते.
- सी-प्लेनसोबत रशियाने स्वत:चे पायलटही पाठवले होते ज्यांना भीषण आग विझविण्याचा अनुभव होता.

70 हजार लोक बेघर-
- इस्त्रायलमधील हैफा शहरातील जंगलात भीषण आग लागली असून यामुळे 70 हजार लोक बेघर झाले आहेत.
- इस्त्रायलमधील तिस-या सर्वात मोठ्या हैफा शहरातील जंगलाला मंगळवारी लाग लागली.
- वेगाच्या वा-यामुळे आग वाढत गेली आणि दुस-याच दिवशी शेकडो इमारतीला त्याची झळ पोहचली.
- या आगीमुळे सुमारे 70 हजार लोक बेघर झाले आहेत. हजारों लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.
- जंगलात लागलेल्या आगीमुळे येरूसलम आणि पश्चिमी भागातील धोका निर्माण झाला होता. मात्र तो नियंत्रणात आणला गेला.
- इस्त्रायलचे पब्लिक सिक्युरिटी मिनिस्टर गिलाद अर्दान यांचे म्हणणे आहे की, ही आग जाणून बुझून लावली गेली असावी.
- इस्त्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतन्याहू यांनी लोकांना आवाहन केले होते की, घाबरून जाऊ नका. सरकार पीडितांच्या मदतीला तत्काळ तयार आहे.
- नेतन्याहू यांनी पॅलेस्टिनीकडे अप्रत्यक्ष बोट दाखवत इशारा दिला आहे की, जर ही आग मुद्दाम लावली गेली असेल तर याला दहशतवादी हल्ला मानला जाईल. तसेच आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल.
मुस्लिम देशांनी केला होता जल्लोष-
- इस्त्रायलमधील हैफा शहरातील जंगलात भीषण आग लागल्यानंतर आखाती देशातील अनेक मुस्लिम देशांनी जल्लोष केला होता
- एका इस्त्रायली वेबसाईटने अलअफसी नावाच्या एका यूजरच्या ट्वीटचा हवाला देत हा खुलासा केला होता.
- अलअसफी नावाच्या यूजरचे हे ट्वीट गुरुवारी वायरल झाले होते.
- हे ट्वीट अरबी भाषेत लिहले आहे, ज्यात अलअसफीने आनंद व्यक्त करताना लिहले की, ...‘तेल-अवीव जळत आहे’.
- अलअसफीने अशी दोन ट्वीट केली. यासोबत त्याने इस्त्रायलमधील हैफा शहरात लागलेल्या आगीचे अनेक फोटो जोडले होते.
- हे ट्वीट नंतर अरब वर्ल्डमध्ये वायरल झाले होते ज्यावर हजारो लोकांनी कमेंट केल्या.
- अबूधाबीतील एका पोलिस अधिका-याने ट्वीट केले की, ‘इस्त्रायलने मशिदीवर बंदी घालताच त्यांना आगीने घेरले.’
- याशिवाय इजिप्त, जॉर्डन आणि अनेक आखाती देशांतील यूजर्सनी या घटनेबाबत आनंद व्यक्त करणारी टि्वट केली.
- या प्रकरणात कुवेतच्या सर्वात मोठ्या मशिदीचा इमाम ही मागे नाही. इमामने लिहले, ‘मुबारक हो, इस्त्रायल जळत आहे.’
पुढे स्लाईडद्वारे पाहा, इस्त्रायलमधील आगीचे भयानक फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...