आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपडे धुण्यासाठी खोलली वॉशिंग मशीन, आतमध्ये होती ही खतरनाक गोष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग- जगभरात पर्यावरणाचा ऱ्हास होत असून जंगलांचे प्रमाण कमी होत चालले आहे. त्यामुळे अनेक माणूस आणि जंगलातील प्राण्यांमध्ये संघर्ष उभा राहत आहे. दक्षिण चीनमध्ये अशीच एक घटना घडली. एका महिलेने कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन खोलल्यावर त्यात चक्क 26 किलो वजनाचा साप लपून बसलेला होता.
 
घाबरून ओरडली महिला
- चीनमधील चाओजोऊ प्रांतातील बैटी गावात राहणाऱ्या झांग नाम या महिलेने कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन उघडल्यावर तिला धक्काच बसला. तिने झाकण उघडल्यावर पाहिले की मशीनच्या मधोमध काहीतरी आहे. सुरवातीला तिला वाटले की ते बेडशीट आहे. पण ती वस्तू हालत असल्याचे पाहिल्यावर तिला भिती वाटली. तिने नीट पाहिल्यावर तिच्या लक्षात आले की हा तर साप आहे. त्यानंतर तिने लगेच अॅनिमल रेस्क्यू सेंटरला फोन केला. हा साप बोआ कंस्ट्रिकटर जातीचा असून तो चीनच्या कायद्याप्रमाणे संरक्षित करण्यात आला आहे. त्याला नंतर तेथून पोत्यात घालून नेण्यात आले. 
 
मध खाण्यासाठी आला होता साप
- झांग या घरात मधमाशांचे पाळतात. शेजाऱ्यांनी सांगितले की, कदाचित हा साप तेथे मध खाण्यासाठी आला असावा. तो वॉशिंग मशीनमध्ये अडकला होता. तो विषारी नसून त्याच्या मोठ्या आकारामुळे अनेक जण त्याला घाबरतात.
 
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...