आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Woman Was Killed After Being Involved Into An Escalator

चीनमध्‍ाील एक दु:खद घटना: ह्रदय विकार असलेल्‍यांनी हा व्हिडिओ पाहू नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महिलेला वाचवण्‍याचा प्रयत्‍न करतांना मॉलचे स्‍टाफ मेंबर - Divya Marathi
महिलेला वाचवण्‍याचा प्रयत्‍न करतांना मॉलचे स्‍टाफ मेंबर
व्हिडिओ डेस्‍क- चीनच्‍या झिेगझोन शहरात एक दु:खद घटना रविवार (26 जुलै) रोजी घडली आहे. हुबई प्रांतातील एका शहरात मॉलमध्‍ये एक्‍सलेटरमध्‍ये महिला अडकल्‍याने तिचा मृत्‍यु झाला आहे. या महिलेने एक्‍सलेटरमध्‍ये अडकत असतांना शेवटच्‍या क्षणात मुलाला बाजुला ढकलुन देवून आपल्‍या लहान मुलाचा जीव वाचवला. ही महिला पती आणि आपल्‍या लहान मुलासोबत मॉलमध्‍ये आली होती.
या महिलेला आणि तिच्‍या पतीला मॉलच्‍या स्‍टाफने एक्‍सलेटरचा उपयोग करू नका अशी सुचना देखील दिली होती. परंतु या महिलेने ऐकले नाही आणि शेवटच्‍याक्षणी पेंडॉल स्‍टँडमध्‍ये फसली. पेंडॉल स्‍टॅंड खुला झाल्‍याने तिचा मृत्‍यु झाला.
सुत्राच्‍या माहिती आधारे एक्‍सलेटर मेंटेन्‍ससाठी बंद करण्‍यात आले होते. या जोडप्‍यांना एक्‍सलेटरवर चढण्‍यास मॉलच्‍या स्‍टाफने नकार देखील दिला होता. या महिलेचा पती तेथेच थांबला परंतु महिलेने सुचनाकडे कानाडोळा केला. ती जशी एक्‍सलेटरवर गेली, आणि एक पेंडॉल खुला झाला. त्‍यात ही महिला अडकली, शेवटच्‍या काही क्षणात तिने आपल्‍या मुलाला जवळ उभ्‍या असलेल्‍या स्‍टाफमधील महिलेकडे ढकलुन दिले. परंतु तीला खुला झालेल्‍या पेंडॉल मधून बाहेर येता आले नाही. त्‍यात तीचा मृत्‍यु झाला. या महिलेचे नाव अद्याप कळू शकले नाही.
एक्‍सलेटरचा कोणी वापर करूनये यासाठी मॉलच्‍या व्‍यवस्‍थापकाने एक्‍सलेटरच्‍या दोन्‍ही बाजुला स्‍टाफ मेंबर उभे केलेले होते. जवळ उभ्‍याअसलेल्‍या महिला स्‍टाफ मेंबरने या महिलेला वाचवण्‍याचा प्रयत्‍न केला परंतु तीला श्‍यक्‍य झाले नाही. आणि या अपघातात तिचा मृत्‍यु झाला.
पुढील स्‍लाईड क्लिककरून पाहा घटनेचे काही फोटो...