आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत, रशियासह अनेक देशांत डोनाल्ड ट्रम्पच्या विजयानंतर असा झाला जल्लोष!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डोनाल्ड  ट्रम्प यांचे सपोर्टर न्यूयॉर्कमध्ये असे जल्लोष करत होते. - Divya Marathi
डोनाल्ड ट्रम्प यांचे सपोर्टर न्यूयॉर्कमध्ये असे जल्लोष करत होते.
इंटरनॅशनल डेस्क- यूएस प्रेसिडेंशियल इलेक्शनमध्ये रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प (70) विजयी झाले. ते अमेरिकन इतिहासातील प्रेसिडेंट बनलेले सर्वात जास्त वयाचे आणि मागील 60 वर्षातील प्रेसिडेंट बनणारे दुसरे बिगर राजकीय व्यक्ती ठरले आहेत. ट्रम्पने ऐतिहासिक विजय मिळवत डेमोक्रेटच्या हिलरी क्लिंटन यांना 279 विरूद्ध 229 या इलेक्टोरेल वोटच्या अंतराने हरवले. व्हाईट हाउसमध्ये पोहचण्यासाठी अमेरिकन उमेदवाराला 270 वोटची गरज असते. आपल्या विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना संबोधित केले.
एकीकडे विजयानंतर डोनाल्ड ट्रम्प समर्थकांत जल्लोषाचे वातावरण होते तर दुसरीकडे, हिलरी क्लिंटनने आपल्या समर्थकांसह देशभरातील नागरिकांना संबोधित न करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांच्या विजयानंतर फक्त अमेरिकेत नाही तर रशिया, भारतासह अनेक देशात जल्लोष साजरा करण्यात आला. रशियाबाबतच बोलायचे झाल्यास रशियन प्रेसीडेंट व्लादिमिर पुतिन यांचे ट्रम्प यांना समर्थन होते. याचमुळे अनेक लोक मॉस्कोत पार्टी साजरा करताना दिसले. भारतातही ट्रम्प यांच्या विजयाचे सेलिब्रेशन केले गेले.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोतून पाहा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा जगभर कसा साजरा केला जल्लोष.....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...