Home | International | China | Xi Orders PLA To Be Combat Ready As He Begins 2nd Term

सैनिकांनो युद्धासाठी तयार राहा, दुसऱ्यांदा चीनचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर म्हणाले जिनपिंग

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 27, 2017, 04:20 PM IST

चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीशी संवाद साधला.

 • Xi Orders PLA To Be Combat Ready As He Begins 2nd Term
  बीजिंग - चीनच्या राष्ट्राध्यक्ष पदी दुसऱ्यांदा निवड झाल्यानंतर शी जिनपिंग यांनी पीपल्स लिबरेशन आर्मीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सैनिकांना युद्धासाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे. जगातील सर्वात मोठे लष्कर असलेल्या चीनच्या सैन्य दलात 23 लाख जवान आणि अधिकारी आहेत. चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने नुकतेच झालेल्या काँग्रेसमध्ये शी जिनपिंग यांना दुसऱ्यांदा देशाचा आणि पक्षाचा नेता निवडले आहे. भारतासाठी शी जिनपिंग यांचे लष्कराला दिलेले आवाहन लक्षवेधी ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच भारत आणि चीनमध्ये सुरू असलेला 72 दिवसांचा डोकलाम वाद संपुष्टात आला आहे. चीनने हा वाद शांतता चर्चेतून सुटल्याचे सांगितल्यानंतरही राष्ट्राध्यक्षांनी आपल्या लष्कराला युद्धासाठी सज्जा राहण्याचे आवाहन केले आहे.

  पुढील स्लाइड्सवर पाहा, अशी होते चीनमध्ये राष्ट्राध्यक्षांची निवड...

 • Xi Orders PLA To Be Combat Ready As He Begins 2nd Term
  पुढे, राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची प्रकिया... 
 • Xi Orders PLA To Be Combat Ready As He Begins 2nd Term
  देशभरातून असे निवडले जातात प्रतिनिधी
  - चीनचा सर्वोच्च नेता बनण्यासाठी उमेदवाराने पक्षाच्या नॅशनल काँग्रेसचे सदस्य असणे आवश्यक आहे. 
  - देशाच्या वेग-वेगळ्या प्रांत, शहर आणि काउंटीसह पक्षाच्या विविध स्तरांवरून येणाऱ्या लोकांपैकी 2000 प्रतिनिधी निवडले जातात. यावेळी प्रतिनिधींची संख्या 2287 इतकी आहे. 
  - ही निवड प्रक्रिया काँग्रेसमध्येच होत असते आणि देशातून जवळपास 2000 प्रतिनिधी निवडण्यासाठी सीपीसीचे जवळ-जवळ 9 कोटी अधिकृत सदस्य मतदान करतात. 
   
 • Xi Orders PLA To Be Combat Ready As He Begins 2nd Term
  अशी बनते पक्षाची सेंट्रल कमिटी
  पक्षाच्या काँग्रेस दरम्यान निवडलेले प्रतिनिधी सेंट्रल कमिटीचे सदस्य निवडण्यासाठी मतदान करतात. सध्या सेंट्रल कमिटीमध्ये 370 सदस्य आहेत. यापैकी 200 स्थायी आणि 170 पर्यायी आहेत. पर्यायी सदस्य स्थायी सदस्यांच्या अधिपत्याखाली राहून काम करतात. 
 • Xi Orders PLA To Be Combat Ready As He Begins 2nd Term
  पॉलिट ब्युरो आणि स्टॅन्डिंग कमिटी निवड
  सेंट्रल कमिटी कम्युनिस्ट पार्टीची सर्वोच्च संस्था आहे. यायच कमिटीच्या सदस्यांना पॉलिट ब्युरो मेंमर्स निवडण्याचा अधिकार आहे.
   
 • Xi Orders PLA To Be Combat Ready As He Begins 2nd Term
  पक्षाचा प्रमुख
  पार्टीच्या सेंट्रल कमिटीचा जनरल सेक्रेटरी हाच सीपीसीचा प्रमुख असतो. त्याला देश आणि सचिवालयांचा सर्वोच्च अधिकारी मानले जाते. तो पॉलिट ब्युरोचा देखील प्रमुख असतो. पक्षाच्या घटनेनुसार, जनरल सेक्रेटरीवरच पॉलिट ब्युरो आणि स्टॅन्डिंग कमिटीच्या बैठका बोलावण्याची जबाबदारी आहे. चीनचे लष्कर सुद्धा देशाला नसून पक्षाला जबाबदार आहे. अर्थातच पक्षाचा प्रमुख हाच लष्कराचा सर्वोच्च प्रमुख आहे.

Trending