चीन अध्यक्ष निवडणूक; / चीन अध्यक्ष निवडणूक; जिनपिंग यांची निवड निश्चित, पक्षाच्या घटनेत शी यांचे विचार समाविष्ट होणार

Oct 16,2017 03:11:00 AM IST
बीजिंग - चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना (सीपीसी) १८ ऑक्टोबरपासून आपले १९ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करत आहे. दर ५ वर्षांनी ही बैठक होते. तीत पक्षाला नवा नेता आणि देशाला नवे अध्यक्ष मिळतात. शी जिनपिंग हे पुन्हा अध्यक्ष होणार हे निश्चित आहे.
त्याआधी ११ ते १४ ऑक्टोबरपर्यंत सीपीसीच्या मध्यवर्ती समितीची बैठक झाली. तीत जिनपिंग यांनी आपल्या अनेक निकटवर्तीयांना पक्षाचे पदाधिकारी केले आहे. जिनपिंग २०१२ मध्ये सत्तेत आले होते. तेव्हापासून त्यांची प्रतिमा खूप उंचावली आहे. जिनपिंग यांना ‘कोअर लीडर ऑफ चायना’ ही पदवी मिळाली आहे. सीपीसीमध्ये जिनपिंग यांचे सहकारी वाढले आहेत. त्यामुळे पक्ष घटनेत दुरुस्ती करून ‘शी जिपिंग विचारसरणी’चा समावेश करेल. तसे झाल्यास जिनपिंग हे माओ आणि जियाओपिंग या नेत्यांच्या यादीत येतील. चीनमध्ये सध्या मार्क्सवाद-लेनिनवाद, माओ विचारसरणी आणि डेंग जियाओपिंग थेअरीचा अवलंब केला जातो.
१४० काेटी लाेकसंख्येच्या देशात २०० सदस्य करतात राष्ट्राध्यक्षांची निवड
{ सीपीसी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये महासचिवाची निवड करते. तीच व्यक्ती जगातील सर्वाधिक लाेकसंख्येच्या देशाची (चीन-१.४० अब्ज) धुरा सांभाळते.
{ सीपीसीत एकूण २,३०० प्रतिनिधी अाहेत. या वेळी २,२८७ प्रतिनिधीच काँग्रेसमध्ये सहभागी हाेतील, तर १३ जणांची हकालपट्टी झाली अाहे.
{ सीपीसीच्या मध्यवर्ती समितीत २०० सदस्य असतात. ही समिती पाॅलिट ब्यूराेची निवड करते. या माध्यमातूनच स्थायी समिती निवडली जाते.
{ पाॅलिट ब्यूराेत २४, तर स्थायी समितीत केवळ ७ सदस्य अाहेत. या दाेन्ही समित्यांकडे सर्वात जास्त अधिकार असतात.
कमी वयाच्या नेत्यांना काेअर टीममध्ये मिळेल स्थान
{ १९व्या राष्ट्रीय काँग्रेसमध्ये शी जिनपिंग पुढील पाच वर्षांसाठी चीनच्या धाेरणाची दिशा व दशेवर अहवाल सादर करतील.
{ पाॅलिट ब्यूराे व स्थायी समितीत नवीन चेहऱ्यांना स्थान मिळण्याची चिन्हे अाहेत. सीपीसीत भविष्यातील नव्या नेत्यांना जागा मिळण्याची अाशा व्यक्त केली जातेय.
{ सीपीसीने महत्त्वपूर्ण पदांसाठी वयाेमर्यादा निश्चित केली अाहे. पाॅलिट ब्यूराेमधील बहुतांश सदस्यांना पद साेडावे लागेल. कारण त्यांचे वय ६८ वर्षाहून अधिक अाहे.
{ यात भ्रष्टाचारविराेधी संस्थेचे प्रमुख वॉंग किशानही अाहेत. तथापि, वॉंग हे जिनपिंग यांचे महत्त्वाचे सहकारी अाहेत. त्यामुळे त्यांना पदावर कायम ठेवण्यात येईल, अशी सांगितले जातेय.
जिनपिंग यांनी ५ वर्षांत १० लाख भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केली कारवाई
{जिनपिंग हे ५ वर्षांपासून भ्रष्टाचारविराेधी अभियान राबवत अाहेत. त्यात त्यांनी १० लाख भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली अाहे.
{‘शी’ नावाने चीनमध्ये एक अांदाेलनही झाले हाेते. त्यामुळे जिनपिंग यांची लाेकप्रियता खूप वाढली. अाता लाेक त्यांना प्रेमाने ‘शी दादा’देखील म्हणतात.
{अांतरराष्ट्रीय स्तरावर दक्षिण चीन समुद्राचा विस्तार व ‘वन बेल्ट-वन राेड’ हे जिनपिंग यांचे माेठे यश अाहे.
{त्यांच्या नेतृत्वात चीनने जगासमाेर स्वत:ला पर्यायी महाशक्तीच्या रूपात सादर केले अाहे. तसेच उ.काेरियाविरुद्धही त्यांनी कठाेर पावले उचलली.
पुढील स्‍लाइडवर...कम्युनिस्ट पार्टीची चीनवर ६८ वर्षांपासून अखंड सत्ता ...
कम्युनिस्ट पार्टीची चीनवर ६८ वर्षांपासून अखंड सत्ता ... कम्युनिस्ट पार्टी चीनवर ६८ वर्षांपासून सत्ता करत आहे. पक्षाने अनेक प्रकारचे चढ-उतार पाहिले आहेत. परंतु पक्षाची ताकद नेहमीच वाढत राहिली. पहिली काँग्रेस : १९२१ अतिशय गुप्तपणे शांघायमध्ये आयोजन. त्यात कम्युनिस्ट नेता माआे-त्से-तुंगही उपस्थित होते. तेव्हा ते तरुण नेतृत्व होते. माआे नेता बनले : ७ वे अधिवेशन १९४५ मध्ये चीन-जपान युद्धाच्या समाप्तीदरम्यान आयोजित केले होते. यानान हा कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला. तेथेच ही बैठक झाली. त्यात माआे सर्वोच्च नेता म्हणून उदयास आले. बैठकीतील माआेंचे विचार हेच पुढे पक्षाचा मुख्य आधार, विचार बनले. सांस्कृतिक क्रांती : ९ वी काँग्रेस १९६७ मध्ये झाली. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीचे दिवस होते. माआेंनी सत्तेवरील आपली पकड बळकट करण्यासाठी या क्रांतीचा उपयोग केला होता. चिनी समाजवाद : १९८२ मध्ये १२ वे अधिवेशन झाले. त्यात नेता तंग शियाआेफिंग यांनी चिनी समाजवादाचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे चीनमध्ये आर्थिक सुधारणांचा मार्ग प्रशस्त झाला. देशाची वाटचाल कम्युनिस्ट विचारसरणीकडून भांडवलदारीकडे सुरू झाली. भांडवलदारांना महत्त्व : २००२ मध्ये १६ वी काँग्रेस झाली. त्यात खासगी उद्योजकांना पक्षाचे सदस्यत्व देण्यास आैपचारिक परवानगी मिळाली. जिनपिंग यांचा उदय : २००७ मध्ये १७ वे अधिवेशन झाले. त्यात पाचव्या पिढीचे शी जिनपिंग व ली केकियांग हे सीपीसीच्या स्थायी समितीचे सदस्य बनले. तोपर्यंत ते पॉलिट ब्यूरोचे सदस्यदेखील नव्हते.
X