आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 1.15 Crores Rupee Computer, Apple First Generation PS Thrown In Garbage

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कच-यात सव्वा कोटीचा संगणक, अॅपलचा पहिल्या पिढीतील संगणक फेकून दिला होता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिल्पिटास - कचरा म्हणून तुम्ही फेकलेली एखादी वस्तू दुस-यासाठी बहुमाेल खजिना ठरू शकतो. मात्र, त्यासाठी वस्तू पारखण्याचा दृष्टिकोन हवा. अमेरिकेच्या मिल्पिटास शहरातील एक महिला आपल्या घरात ठेवलेल्या खजिन्याला ओळखू शकली नाही. तिने ही वस्तू डब्यात बंद करून रिसायकल फर्ममध्ये टाकून दिली. हा होता १९७६ मध्ये तयार झालेला अॅपलचा डेस्कटॉप. कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांनी निर्मिती केलेल्या २०० अॅपल आयपैकी एक होता. फर्मने त्याची विक्री केली तेव्हा त्यांना १.२६ कोटी रुपयांची कमाई झाली. आता याची निम्मी किंमत देण्यासाठी महिलेचा शोध घेतला जात आहे.
संगणक टाकणा-या महिलेची माहिती नाही
फर्मचे उपाध्यक्ष व्हिक्टर गिचन म्हणाले, एका शुक्रवारी फर्म बंद करण्याच्या तयारीत होतो. त्या वेळी एक महिला काही साहित्य घेऊन आली. गॅरेजमध्ये ठेवलेल्या या कच-यापासून कोणत्याही स्थितीत सुटका करून घ्यावयाची असल्याचे तिने सांगितले. दोन महिन्यांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले. घराच्या साफसफाईवेळी हा बॉक्स सापडला. याची मला काहीही आवश्यकता नसल्याचे तिने सांगितले. आपण तिला पावती घेण्यास सांगितले, मात्र तिने त्यास नकार दिला. रिसायकलसाठी आणलेला डबा तिथेच ठेवून ती एसयूव्हीने निघून गेली. दोन आठवड्यांनंतर आम्ही जेव्हा बॉक्स उघडला तेव्हा त्यात अॅपल आय डेस्कटॉप दिसला. तो बनावट असेल असे पहिल्यांदा वाटले. मात्र, तपासाअंती वास्तव समोर आले आणि ही दुर्मिळ सिस्टिम पाहून आम्ही चकित झालो. आता माझी कोणत्याही परिस्थितीत महिलेस निम्मी रक्कम देण्याची इच्छा आहे. वस्तू देणा-या व्यक्तीस ५० टक्के रक्कम देण्याचे आमच्या कंपनीचे धोरण आहे. त्यामुळे या महिलेस आम्ही एक लाख डॉलर देऊ.