आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराणीच्या वाढदिवसावर १ अब्ज पाउंड खर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - महाराणी एलिझाबेथ द्वितीयचा या वर्षी ब्रिटनमध्ये साजऱ्या होणाऱ्या वाढदिवसावर १ अब्ज पाउंड खर्च होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वसाधारपणे निम्मे ब्रिटिश नागरिक या वर्षी एप्रिल ते जून महिन्यात ही ऐतिहासिक घटना साजरी करण्याच्या प्रयत्नात आहेत.

तीनपैकी एक नागरिक पब्स, बार आणि स्ट्रीट पार्टीचे आयोजन करणार असल्याचे द संडे टाइम्सच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. याशिवाय टीव्हीवरील वाढदिवसाचा कार्यक्रम पाहत मद्यपान करण्याची योजना २५ टक्के लोकांची आहे. त्यामुळे २००० नागरिकांच्या पाहणीत साधारण १ अब्ज पाउंड खर्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वेक्षणात सरासरी एक व्यक्ती वाढदिवसावर ४२.९८ पाउंड खर्च करतील. पुरुषांनी महिलांपेक्षा २० पाउंड जास्त खर्च करण्याची इच्छा व्यक्त केली. महाराणीचा खरा आणि अधिकृत वाढदिवस २१ एप्रिल आणि ११ जून रोजी साजरा केला जातो. राणीच्या अधिकृत वाढदिवसानिमित्त ब्रिटनमध्ये आठवडाभर कार्यक्रमाचे अायोजन करण्यात आले आहे. "ट्रूपिंग ऑफ कलर' कार्यक्रमाचे ११ जून रोजी आयोजन केले आहे.

स्कॉटलंडचे नागरिक जास्त खर्च करणार
लंडनमधील मॉलमध्ये १२ जून रोजी १० हजार पाहुण्यांच्या उपस्थितीत स्ट्रीट पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी युवराज विल्यम आणि हॅरी संयुक्त अध्यक्ष असतील. स्ट्रीट पार्टीसाठी १५० पाउंड तिकीट ठेवण्यात आले आहे. ब्रिटनमध्ये साधारण १५ टक्के लोक राणीच्या सन्मानार्थ होणाऱ्या या पार्टीमध्ये सहभागी होतील. लंडन, ब्रिजटोन, प्लायमाऊथ आणि बेलफास्टमधील अर्ध्यावर नागरिक स्ट्रीट पार्टीमध्ये सहभागी होण्याची अपेक्षा आहे. स्कॉटलंडमध्ये राजेशाहीची लोकप्रियता पाहता तेथील प्रत्येक नागरिक वाढदिवसाच्या कार्यक्रमावर साधारण ४९.४१ डॉलर खर्च करण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या तुलनेत हा खर्च मानसी १० पाउंड जास्त आहे. बेलफास्टमध्ये हा खर्च प्रतिनागरिक २६.३२ पाउंड होण्याची शक्यता सर्वेक्षणात व्यक्त झाली.