आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत जगातील 10 सर्वात मोठी घरे, अंबानींचे अँटिलाही दुसऱ्या स्थानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वतःचं घर असणे हे प्रत्येकाचेच स्वप्न असते. संपूर्ण कुटुंबाला चांगल्या रितीने राहता यावे अशा माफक अपेक्षा घराबाबत सगळ्यांच्या असतात. त्यात अधिक मोकळे घर मिळाले तर मग आनंदाला पारावरच उरत नाही. त्यातही हवे तसे लोकेशन मिळणे हे तर जणू नशिबावरच सोडलेले असते. सामान्यांच्या अपेक्षांचं म्हटलं तर दोन हजार स्क्वेअर फुटाचं घर म्हणजे खूप झालं. पण जसजशी श्रीमंती वाढत जाते तसा घरांचा आकारही वाढत असलेला आपल्याला दिसतो.

अनेक बंगले अगदी दहा हजार स्क्वेअर फुटांमध्येही बांधलेले असतात. पण हे एवढ्यावरच थांबत नाही. गर्भश्रीमंत किंवा अगदीच धनाढ्य लोकांच्या बंगल्यांचे आकार पाहिले तर आपल्याला चक्करच येते. जगभरात अशी अनेक मोठी मोठी घरे आहेत. यामध्ये कितीतरी बेडरूम, स्विमिंग पूल, स्वतंत्र थिएटर यासह पंचतारांकित सुविधा असतात. हजारो सक्वेअर फुटांमध्ये याचे बांधकाम असते. जगातील अशाच सर्वात मोठ्या दहा निवासी घरांबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा अँटिला बंगला या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. अगदी एखाद्या लहानशा गावाच्या आकाराएवढी असणारी ही घरे काही मोजक्या लोकांच्या राहण्यासाठीच असतात. तसे यांना घरे म्हणावे कसे हाही प्रश्न आहे. कारण बंगला, महाल हे शब्दही यांच्या उंचीला साजेशे वाटत नाही. पण याठिकाणी ते प्रत्यक्ष राहतात त्यामुळे आपण त्याला घरे म्हणायला हरकत नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणी पछाडलंय अनिल अंबानींना या स्पर्धेत...
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, जगातील १० सर्वात मोठ्या घरांबाबत...
बातम्या आणखी आहेत...