आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Killed In Attack On Police Officers Bus In Turkey

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुर्कस्तान : पोलिसांच्या बसला केले लक्ष्य, स्फोटात 10 अधिकारी ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुर्कस्तानात हल्ला करण्यात आलेली मिनीबस. - Divya Marathi
तुर्कस्तानात हल्ला करण्यात आलेली मिनीबस.
अंकारा - तुर्कस्तानमध्ये पोलिसांच्या मिनिबसला लक्ष्य करून स्फोट घडवून आणल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात 10 पोलिस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. सरकारी अधिका-यांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तुर्कस्तानच्या इगदिर प्रांतात हा हल्ला घडवण्यात आला आहे. यात अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. या हल्ल्याचा संशय कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दोगन न्यूज एजन्सीच्या रिपोर्टनुसार या बसमध्ये काही पोलिस अधिकारी दिलुकु बॉर्डर पोस्टकडे जात होते. ही पोस्ट तुर्कस्तान आणि अजरबेजान सीमेवर आहे. दरम्यान हसनकोए गावाजवळच जेव्हा ही बस पोहोचली तेव्हा लगेचच ब्लास्ट झाला. हक्कारी प्रांतात पोलिसांच्या शस्त्रांच्या वाहनावर हल्ला करण्यात आला होता. त्याच्या दोन दिवसांनंतर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात 16 जवान मारले गेले होते. तुर्कस्तानच्या पूर्वेकडील भागात गेल्या काही आठवड्यांमध्ये हल्ल्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

तुर्कस्तानात पीकेकेच्या विरोधात मोहीम
तुर्कस्तानने गेल्या महिन्यात पीकेकेच्या विरोधात इराक आणि सिरियामध्ये हवाई हल्ले सुरू केले होते. तर सोमवारी रात्री तुर्कस्तानने शहराच्या कुर्दिस्तान वर्कर्स पार्टीच्या आतंकवादियों अनेक तळांवर हवाई हल्ले केले. त्यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. तुर्कस्तानने दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर हे हल्ले केले आहेत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सबंधित PHOTO