आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 10 Real Life Cannibals And Their Shocking Stories

मज्जा म्हणून खायचे मानवी मांस, वाचा या रियल लाईफ नरभक्षकांच्या क्रूर कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानवाचे मांस खाणाऱ्या व्यक्तीला कॅनिबल (नरभक्षक) असे म्हटले जाते. शेकडो वर्षांपूर्वी पृथ्वीवर मोठ्या प्रमाणावर कॅनिबल होते असे सांगितले जाते. त्यांच्या या कृत्यामागे विविध कारणे असायची. त्यात पूर्वीपासून चालून आलेली परंपरा हे एक कारण असायचे. त्याचबरोबर काही जण जगण्यासाठी असे कृत्य करायचे तर काही केवळ आनंद मिळतो म्हणून.

आज जगात कॅनिबलचे प्रमाण हे अगदी नगण्य आहे, असे म्हणता येईल. पण हे शून्यावर आलेले नाही. आजही जगात असे काही लोक आहेत, जे मानवी मांस खातात. जगात त्यांना खाण्यासाठी काहीही शिल्लक नाही म्हणून ते मानवाचे मांस खातात असे नाही. तर यामागचे कारण त्यांना मिळणारा आनंद हे आहे. जगातील अशाच काही लोकांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जे मानवी मांस खात होते.

अँड्रेई चिकातिलो (वरील फोटोतील)
हा युक्रेनमध्ये जन्मलेला एक कुप्रसिद्ध सिरियल किलर आणि बलात्कारी व्यक्ती होता. त्याने पोलिसांना 50 लोकांची हत्या केल्याची कबुली दिली होती. तो आधी अनोळखी लोकांबरोबर मैत्री करायचा आणि त्यानंतर त्यांची हत्या करून त्यांचे मांस खायचा असे त्याने स्वतः सांगितले. अटक होईपर्यंत तो एकापाठोपाठ एक हत्या करत होता. रोस्तोव्हमध्ये 14 फेब्रुवारी 1994 रोजी त्याला फाशी देण्यात आली.

पुढील स्लाइड्सवर वाचा, 10 वर्षांच्या चिमुरडीच्या कुटुंबीयांना तो म्हणाला, तिचे मांस खाताना मजा आली..यासह काही हादरवून सोडणाऱ्या कथा..