आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 100 Died In Stamped At Grand Mosque During Ritual Of Haj

मक्का : शैतानाला दगड मारताना चेंगराचेंगरी; मृतांचा आकडा 717 वर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीना - पवित्र मक्का शहराबाहेर असलेल्या मीना येथे हज यात्रेदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये सुमारे 717 मुस्लीम बांधवांचा मृत्यू झाला आहे. तर सुमारे 805 भावीक या दुर्घटनेमध्ये जखमी झाले असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मृतांमध्‍ये 2 भारतीय असल्‍याची माहिती विदेश मंत्रालयाने दिली आहे. सौदीमध्ये गुरुवारी बकरी ईद (ईद उल जुहा) साजरी केली जात आहे. गुरुवारी हज यात्रेचा अखेरचा दिवस होता. या दिवशी शैतानाला दगड मारण्याची प्रथाही पार पडली. त्यामुळे मीना येथे मोठ्या संख्येने भावीक जमलेले होते.

या घटनेनंतर आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात अाली असून अत्यंत वेगामध्ये मदतकार्य सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच मक्का येथील मशिदीमध्ये क्रेन कोसळल्याने सुमारे 109 जण ठार झाले होते. तर 400 जण यामध्ये मृत्यूमुखी पडले होते.
चेंगरी-चेंगरीचे कारण...
अल जजिरा चॅनलने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात मीनामधील 204 स्ट्रीटवर झाला. हा परिसर हाजींसाठी तयार करण्यात आलेल्या कॅप्सच्या जवळ आहे. याठिकाणी काही हाजी बसलेले होते. त्याचवेळी हाजींचा दुसरा एक गट त्याठिकाणी पोहोचला. ते आधी बसलेल्या हाजींच्या वर चढले. त्यानंतर एकच चेंगरा चेंगरी सुरू झाली. सगळे एकमेकांच्या अंगावरून पळू लागले. काही मिनिटांमध्ये मृतदेहांचा खच पडला होता.

मदतकार्यावर किंग यांचे लक्ष
सौदीच्या सरकारी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार किंग सलमान बुधवारपासून मक्कामध्येच आहेत. ते हज यात्रेच्या व्यवस्थापनाची पाहणी करण्यासाठी आले होते. गुरुवारी झालेल्या अपघातानंतर त्यांनी लगेचच मदतकार्य सुरू केले. सरकारने 4000 पेक्षा अदिक लोक या कामासाठी तैनात केले आहेत. घटनास्थळी 200 हून अधिक रुग्णवाहिका बोलावून जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात आले.

* Helpline No: 00966125458000, 00966125496000
यापूर्वीही झाला आहे अपघात
2006 मध्ये 12 जानेवारी रोजीदखिल अशाच प्रकारे शैतानाला दगड मारण्याच्या प्रथेदरम्यान चेंगराचेंगरी झाली होती. त्यात सुमारे 400 हून अधिक भाविकांचा मृत्यू झाला होता.
का मारतात दगड...
मक्का येथे दगड मारणे हे शैतानाच्या विरोधाचे प्रतिक आहे. येते तीन मोठ्या स्तंभांच्या रुपाने शैतान उभे करण्यात आले आहेत. हज यात्रेकरू दगड जमा करतात आणि त्या स्तंभांवर मारतात. शैतान सर्वात आधी अब्राहम, त्यांची पत्नी हेगर आणि मुलगा इशामलसमोर आला होता, असे म्हटले जाते.
मक्कामध्ये यापूर्वी झालेले अपघात...
दिनांकअपघातातील मृत व जखमी
2 जुलै, 1990पायी चालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका टनलमध्ये चेंगराचेंगरी झाल्याने 1,426 जणांचा मृत्यू झाला होता.
23 मे, 1994शैतानाला दगड मारण्याच्या प्रथेदरम्यान 270 ठार.
9 एप्रिल, 1998जमारात ब्रिजवर चेंगराचेंगरीत 118 ठार 180 जखमी.
5 मार्च, 2001शैतानाला दगड मारण्याच्या प्रथेदरम्यान 35 ठार.
11 फेब्रुवारी, 2003शैतानाला दगड मारण्याच्या प्रथेदरम्यान 14 ठार.
1 फेब्रुवारी, 2004शैतानाला दगड मारण्याच्या प्रथेदरम्यान चेंगराचेंगरीत 251 ठार, 244 जखमी.
12 जानेवारी, 2006
चेंगराचेंगरीत 340 ठार, 290 जखमी.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS..
व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा वरील स्लाइडवर...
फोटो - अपघातानंतर ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेले आहेत.