आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांना १०३ भारतीय वंशाच्या उद्योगपतींचा पाठिंबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमध्ये सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली आहे. देशातील रोजगार आणि गुंतवणूक टिकवण्यासाठी भारतीय वंशाच्या उद्योजकांनी पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी लेबर पार्टी सत्तेवर आल्यास गुंतवणुकीला धोका ठरेल, असे भारतीय समुदायाला वाटते.
देशात ७ मे रोजी मतदान होणार आहे. देशात सध्या कॅमरून यांच्या नेतृत्वाखाली लिबरल डेमोक्रॅट्सचे आघाडी सरकार सत्तेवर आहे. भारतीय वंशाच्या उद्योजकांनी त्यांना पाठिंबा दिल्यामुळे कॅमरून यांच्या गटात उत्साहाचे वातावरण आहे. १०३ प्रमुख उद्योगपतींची स्वाक्षरी असलेले पत्र ‘द डेली टेलिग्राफ’ला सोपवण्यात आले आहे.
विरोधी पक्ष लेबर पार्टी सत्तेवर आल्यास नोकऱ्यांना धोका पोहोचू शकतो, असा इशारा उद्योगपतींनी दिला आहे. त्याचा थेट परिणाम गुंतवणुकीवर होईल. सत्तांतर देशासाठी घातक ठरू शकते. प्रिमार्क, आइसलँड, लँडब्रोक्स, कोस्टा कॉफी, टॅड बेकर, मदरकेअर, एल. के. बॅनेट या देशातील आघाडीच्या भारतीय कंपन्यांच्या प्रमुखांनी पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

समर्थन कशासाठी ?
पंतप्रधान डेव्हिड कॅमरून आणि अर्थमंत्री जॉर्ज ऑस्बॉर्न यांचे प्रमुख धोरण उद्योग करात २० टक्के कपात करणे असे राहिले आहे. ब्रिटनला उद्योगासाठी खुले ठेवणे हेच त्यांचे आर्थिक धोरण असल्याचे त्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यातूनच गेल्या वर्षी ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेने वेगाने प्रगती केली. एवढेच नव्हे, तर देशात १८.५ लाख नोकऱ्याही निर्माण झाल्या.