आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांगलादेशमध्ये उरले फक्त १०६ वाघ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशमध्ये वाघांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली अाहे. २००४ मध्ये ४४० वर असणारी वाघांची संख्या आता १०६ वर आली असल्याची माहिती उघडकीस आली आहे. भारत आणि बांगलादेशमध्ये संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणासाठी यंदा तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रभावी पद्धत वापरण्यात आली होती. त्यानुसार सुंदरबनमध्ये १०६ वाघ असल्याचे आढळून आल्याचे वन संरक्षण डॉ. तपन कुमार देव यांनी सांगितले आहे. २००४ मध्ये वाघांची जनगणना करण्यात आली होती. तेव्हा सुंदरबनमध्ये ४४० वाघ आढळून आले होते. त्यासाठी वाघांच्या पायांचे ठसे मोजण्याची पद्धत वापरण्यात आली होती. मुळात ही पद्धत सदोष असल्याचे वन्यजीव तज्ज्ञ डॉ. मोनिरुल एच. खान यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या वेळी घोषित संख्येवर शंका व्यक्त केली जात आहे. खान यांच्या अभ्यासानुसार सुंदरबनमध्ये वाघांची संख्या २०० पेक्षा जास्त नाही. भारत आणि बांगलादेश यांनी संयुक्तपणे केलेल्या यंदाच्या जनगणनेसाठी वाघांशी संबंधित सुमारे १५०० छायाचित्रे आणि पायांच्या ठशांचा उपयोग करण्यात आला. दरम्यान, वन विभागाच्या माहितीनुसार, २००१ ते २०१४ या काळात ४९ वाघांचा मृत्यू झाला.