आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 106 Year Old Says She Can Die Happy After Obama Meeting

१०६ वर्षांच्या वृद्धेची स्वप्नपूर्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील साउथ कॅरोलिना राज्यात १०६ वर्षे वयाच्या व्हर्जिनिया मॅकलॉरिनसाठी रविवार तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण ठरला. कारण खूप काळ प्रतीक्षा केल्यानंतर अखेर तिला व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश मिळाला होता. त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये प्रवेश करताच साक्षात बराक ओबामा आणि त्यांच्या पत्नी मिशेल यांनी त्यांचे स्वागत केले. या दोघांनाही मॅकलॉरिन यांना पाहताच खूप आनंद झाला होता. १०६ वर्षे वयोमान असूनही त्यांच्यातला उत्साह वाखाणण्याजोगा होता. ओबामा दांपत्याने त्यांच्यासोबत नृत्यही केले.

मिशेल ओबामा यांनी त्यांना म्हटले, मीसुद्धा तुमच्या इतकेच जगू इच्छिते. तेव्हा मॅकलॉरिन यांनीसुद्धा आनंदाने शुभेच्छा देत म्हटले, होय, तुम्ही निश्चितच इतकी वर्षे जगाल. मॅकलॉरिन यांचा जन्म १९०९ मध्ये साऊथ कॅरोलिनामध्ये झाला. व्हाइट हाऊसमध्ये कृष्णवर्णीय अध्यक्ष व त्यांच्या पत्नीस भेटल्याचा त्यांना खूप आनंद वाटला. मॅकलॉरिनला खूप प्रयत्नांनंतर प्रवेश मिळाला. खूप कमी लोकांना येथे प्रवेश दिला जातो. २०१४ पासून त्यांचे प्रयत्न चालू होते. बराक ओबामा यांना मॅकलॉरिन यांनी म्हटले, मी व्हाइट हाऊसमध्ये येईन, असे कधी वाटले नव्हते; पण या जन्मातच ते शक्य झाले. व्हाइट हाऊसच्या पेजवर जारी झालेल्या व्हिडिओला ३.१ लाखांहून अधिक लाइक्स आणि १.४ लाखांहून अधिक व्ह्यू मिळालेले आहेत. टि्वटरवर या व्हिडिओला १० हजारांहून अधिक वेळा, तर रिटि्वटवर १४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. फेसबुकवर ५.५ लाख व्ह्यू आणि ९८ हजार लाइक्स मिळाल्या आहेत.