आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा करणाऱ्या 11 भारतीयांना कुवेतमधून परत पाठवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळुरू - कुवेतमध्ये रोजगाराच्या निमित्ताने गेलेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. यापैकी अकरा जणांना कुवेत सरकारने चक्क भारतात परत पाठवले. याचे कारणही विशेष होते. या सर्वांवर देवाची पूजा केल्याचा आरोप होता. पोलिसांनी त्यांना या आरोपावरून अटकही केली. कुवेत सरकारने त्यांना भारतात परत पाठवले.

या भारतीय नागरिकांनी सत्यनारायणाची पूजा केली होती. पूजा केल्याचे पोलिसांना कळले. यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. पोलिसांनी अटकेचे कारण दिले नाही. परतलेल्या नागरिकांनी स्वत: ही माहिती दिली. हे सर्व भारतीय गेल्या १५ ते २० वर्षांपासून कुवेतमध्ये आहेत. त्यांनी सांगितले, ‘आम्ही कोणतेही बेकायदेशीर काम केलेले नाही. पोलिसांनी अटक का केली हेच अद्याप समजू शकलेले नाही.’ या लोकांनी घरात पूजा केली यालाही दहा दिवस उलटून गेले होते. विशेष म्हणजे हे लोक परतले असले तरी त्यांच्या घरातील सामान व इतर किमती वस्तू घरात तशाच आहेत. याबाबत पीडित लोकांनी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली
असून अद्याप त्यावर काहीही निर्णय झालेला नाही.
बातम्या आणखी आहेत...