आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखे निमंत्रण: ११ वर्षीय मुलीने लिहिले अमेरिकी अध्यक्षांना पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- केवळ भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामाही लहान मुलांत प्रचंड लोकप्रिय आहेत. अशातच घडलेला एक किस्सा याची साक्ष आहे. यातून ओबामांना मुलांबद्दल असलेले आकर्षणही दिसले.

ओबामा आपल्या नियोजित कार्यक्रमानुसार वॉटरडाऊनला जाणार होते. तेवढ्यात त्यांना एका ११ वर्षीय मुलीने लिहिलेले पत्र हाती पडले. यात तिने ओबामा डेकोटाला येत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या भागाची वैशिष्ट्येही तिने पत्रात नमूद केली होती. ओाबामांनी एकदा तरी या भागाला भेट द्यावी, अशी विनंती तिने केली होती. या पत्रावर ओबामांच्या दौऱ्यापूर्वी काही वेळ व्हाइट हाऊसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विटही करण्यात आले. असे हाेते हे पत्र...
डियर प्रेसिडेंट ओबामा, मी वर्मिलॉन (एसडी) भागात राहते. आपण संपूर्ण अमेरिकेत, प्रत्येक राज्यांचा दौरा केला आहे. मग साऊथ डेकोटाला का नाही आलात? आपले हार्दिक स्वागत करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. तुम्हाला माहीत आहे का, आमच्या
इथे माउंट रशमोर राष्ट्रीय स्मारक आहे. मी जेव्हा पार्कमध्ये जाते तेव्हा कोयोट्स (उत्तर अमेरिकेत सापडणारा लांडगा) आणि गरुड अगदी आवडीने पाहते. आपणही एकदा इथे यावे.
पी.एस. ।
आपण साऊथ डेकोटाला अद्याप आलाच नाहीत म्हणून माझ्या मनाची ही अवस्था आहे.

दु:खी रिबेका
या पत्राच्या शेवटी रिबेकाने आपली नाराजी सांकेतिक चित्रातून मांडली आहे. आपण डेकोटोला आला नाहीत म्हणून आपल्या हृदयाची ही अवस्था झाल्याचे ती म्हणते.

हे पत्र ओबामांनी वाचले आणि तत्काळ साऊथ डेकोटाला रवाना होण्याचे ठरवले. पूर्वनियोजित कार्यक्रम बदलला आणि ते रिबेकाची भेट घेण्यासाठी रवाना झाले. अमेरिकी राज्यांपैकी एकही राज्य असे नाही, जिथे ओबामांनी आतापर्यंत दौरा केलेला नाही.
बातम्या आणखी आहेत...