आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रान्स: 12500 फूट उंचीवर अडकले 110 पर्यटक, 33 जणांची रात्र गेली कडाक्याच्या थंडीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मो ब्लां (आल्प्स)- युरोपमधील सर्वात मोठी पर्वतरांग असलेल्या आल्प्सच्या मो ब्लां पर्वतावर गेलेल्या पर्यटकांना गुरुवारी मोठ्या संकटाचा सामना करावा लागला. केबल कारमध्ये सायंकाळी अचानक तांत्रिक अडथळा निर्माण झाल्याने ११० पर्यटकांचा जीव हवेतच अडकला होता. त्यात एका दहावर्षीय बालकाचाही समावेश होता.

दरम्यान, रात्री उशिरा मदतकार्य सुरू झाले आणि त्यापैकी ७७ पर्यटकांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. मात्र, ३३ पर्यटकांना कडाक्याच्या थंडीत लटकत्या केबलमध्येच रात्र काढावी लागली.

> हेलिकॉप्टरचा मदतकार्यासाठी उपयोग करण्यात आला. मात्र, सुरक्षेच्या कारणाने रात्री ते थांबवण्यात आले.
> ३२ पर्यटक जमिनीपासून काहीच अंतरावर असल्याने त्यांना लगेच सुरक्षितरीत्या उतरवण्यात आले.
> ३५ मिनिटांचा अवधी लागतो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी. इटली-फ्रान्सदरम्यान किमी अंतराची केबल कार राइड.

पुढील स्लाइडवर वाचा, मदतकार्यातील जवानांनी रात्र काढली सोबतच

बातम्या आणखी आहेत...